आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ईव्हीएम\' एेवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्या; एकत्रित निवडणुका ही भाजपची चाल;काँग्रेसची मागणी-आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी सोनिया गांधीच्या भाषणानंतर गळाभेट घेताना पुत्र राहुल गांधी. रविवारी अधिवेशनाचा समारोप होईल. - Divya Marathi
शनिवारी सोनिया गांधीच्या भाषणानंतर गळाभेट घेताना पुत्र राहुल गांधी. रविवारी अधिवेशनाचा समारोप होईल.

नवी दिल्ली- काँग्रेसने शनिवारी ८४ व्या महाधिवेशनात मोदी सरकारवर हल्लाबोल केला. माजी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या, ‘मोदींचा न खाऊंगा, न खाने दूंगा हा नारा फक्त खुर्ची मिळवण्यासाठीची नाटकबाजी होती.’ ‘बदलांची वेळ’ ही थीम अाणि २०१९ लोकसभा निवडणूक हा महाधिवेशनाचा अजेंडा आहे. आपल्या पहिल्या महाधिवेशनात राहुल यांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदानाची मागणी केली. लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची सूचना मोदींची ही चाल असल्याचे सांगत ती अयोग्य व अव्यवहार्य असल्याचे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस समान विचारसरणी असलेल्या राजकीय पक्षांना सोबत आणण्याचा प्रयत्न कायम ठेवेल, असेही ठरवले आहे.


> सोनिया म्हणाल्या : सबका साथ सबका विकास, न खाऊंगा न खाने दूंगा हा मोदींचा नारा फक्त खुर्ची मिळवण्यासाठीची नाटकबाजी


अहंकारी माेदी सरकार काँग्रेसचा सर्वनाश करू इच्छिते : सोनिया 
अहंकारी व सत्तेत मदमस्त मोदी सरकार काँग्रेसचा सर्वनाश करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व प्रकार आजमावत आहे. हुकूमशाही पद्धतीने विरोधी पक्षांविरुद्ध खोटे खटले चालवले जात आहेत. माध्यमांची मुस्कटदाबी केली जात आहे. मात्र काँग्रेस कधी झुकलेली नाही, ना कधी झुकेल. आम्ही पुराव्यांनिशी सरकारच्या भ्रष्टाचाराचा भंडाफोड करू. 
- सोनिया गांधी, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा


मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला थकवा जाणवू लागला आहे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला थकवा जाणवत आहे. काँग्रेसच देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकते. मोदी सरकार विकासाची कामे करण्याऐवजी रोष वाढवत आहे. आपसांत लोकांना लढवणे हे त्यांचे काम आहे, मात्र काँग्रेस लोकांना एकत्र जोडते. सर्वांना सोबत घेऊन चालते. आज सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, हे सरकार तरुणांना रोजगार कधी आणि कसा देणार?
- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष


आता बोस, पटेल, शास्त्रींसारख्या नेत्यांचेही स्मरण
- काँग्रेस नेते म्हणाले- आम्ही स्वातंत्र्याचा लढा लढलेला आहे. यामुळे आम्हाला राष्ट्रवाद, देशभक्तीबाबत भाजप आणि संघाच्या उपदेशांची गरज नाही.
- आजवर दुर्लक्षित राहिलेल्या सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, शास्त्री व नरसिंह रावांसारख्या नेत्यांचे त्यांच्या योगदानासह अधिवेशनात स्मरण केले गेले.


आघाडीवर काँग्रेसचे मत 
- काँग्रेसने आपल्या आगामी रणनीतीविषयी सांगितले आहे, की समविचारी पक्षांना सोबत घेऊन किमान समान धोरणावर पुढील रणनीती निश्चित केली जाईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि संघाला पराभूत करणे हे पहिले लक्ष्य आहे. 

 

अधिवेशनात कोणत्या विषयांवर चर्चा?
- काँग्रेसच्या अधिवेशनात मतदान यंत्राचा  (ईव्हीएम मशिन)  मुद्दा उपस्थित झाला. पक्षाच्या वतीने प्रकाशित संकल्पपत्रात म्हटले आहे, 'निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने पार पाडण्याची घटनात्मक जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. त्यासोबतच मतदान आणि मतमोजणी पारदर्शकपणे झाली पाहिजे ही देखील त्यांची जबाबदारी आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेवर सामान्यांचा विश्वास राहिल. जनतेमध्ये आणि राजकीय पक्षांनाही ईव्हीएम बद्दल शंका आहे. ईव्हीएमद्वारे हवेतसे निकाल लावले जात असल्याची अनेकांना शंका आहे.'
- यामुळे निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास कायम राहावा यासाठी जुनी मतपत्र आणि मतपेटीची पद्धत परत आणावी याचाही पुरस्कार अधिवेशनात करण्यात आला.