आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Congress President Rahul Gandhi Launch Nationwide Save The Constitution Campaign

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आधी विरोधक संसदेचे कामकाज रोखत होते, आता सरकारने संसदेला रोखून धरले - राहुल गांधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - काँग्रेसच्या 'संविधान बचाव' अभियानाला सोमवारी येथील तालकटोरा स्टेडियममध्ये सुरुवात झाली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दलित विरोधी असल्याचे टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, देशातील घटनात्मक संस्थावर सध्या आरएसएसच्या लोकांची नियुक्त होत आहे.  सर्वसाधारणपणे विरोधक हे संसदेचे कामकाज रोखत असतात मात्र, सध्याचे सरकारच हे संसदेत कामकाज होऊ देत नाही अशी स्थिती आहे, असा टोलाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला. काँग्रेसने सुरु केलेले संविधान बचाव अभियान पुढील वर्षी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल 2019) पर्यंत सुरु राहाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस, मोदी सरकार हे कसे दलित विरोधी आहे जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. याचा आगामी निवडणुकीत फायदा होईल असे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. देशामध्ये 17% हे दलित मतदार आहेत. येत्या वर्षभरात मध्यप्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक सारख्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. 

 

- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, देशाचे पंतप्रधान फक्त त्यांच्याच मन की बात सांगात असतात. ते कोणाला बोलू देत नाही आणि कोणाचे ऐकतही नाहीत. ते जेटली आणि गडकरींसारख्या नेत्यांनाही बोलू देत नाहीत. ते म्हणतात फक्त माझे ऐका. येत्या 2019 च्या निवडणुकीत मात्र देश 'मन की बात' करणार आहे आणि ती मोदींना ऐकावी लागेल. 

'पहिले जग आपल्याकडे आदर्श देश म्हणून पाहात होते'
- राहुल गांधी म्हणाले, 'पूर्वी जगात भारताची वेगळी ओळख होती. संपूर्ण जग भारताकडे पाहात होते. येथे विविध जाती-धर्माचे लोक आहेत, विविध विचारधारांचे लोक आहे. हे सर्व एकत्र राहातात, याचे जगाला आश्चर्य वाटत होते. भारतातील घटनात्मक संस्था, सुप्रीम कोर्ट, विधानसभा, राज्यसभा यांच्याकडून आपण काही शिकले पाहिजे, अशी जगातील इतर देशांची भावना होती. त्यांना आपल्याप्रमाणे काम करण्याची इच्छा होती. मात्र आता उलट झाले आहे. आपली प्रतिमा जगात खराब झाली आहे. मोदींनी ती खराब केली आहे. आज आपल्याबद्दल बोलले जाते की या देशात महिलांवर बलात्कार होतात, अल्पसंख्याक समाजावर अत्याचार आणि दलितांची हत्या होत आहे.

बातम्या आणखी आहेत...