आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१२ पक्षांसोबत मिळून काँग्रेस मांडणार मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. जमावाकडून हत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, आरक्षणासारख्या मुद्द्यांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळाची शक्यता आहे. एकजुटीने सरकारची कोंडी करण्याचे सूतोवाच विरोधकांनी केले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. सर्व मुद्दे आणि प्रश्नांवर नियमानुसार चर्चेचे आश्वासन दिले. दुसरीकडे, काँग्रेससह १२ विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली. हे अधिवेशन १० ऑगस्टपर्यंत चालेल. 

बातम्या आणखी आहेत...