आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे 7 वर्षांनंतर महाअधिवेशन, राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पहिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेसचे दोनदिवसीय ८४ वे महाअधिवेशन शनिवारी राजधानीत सुरू झाले. पहिल्या दिवसापासूनच काँग्रेसने मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. पक्षाने महाअधिवेशन ‘परिवर्तनाची हीच वेळ’ या संकल्पनेवर आयोजित केले आहे. त्याशिवाय महाअधिवेशनाच्या एक दिवसापूर्वी काँग्रेस अध्यक्षांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरील नाव ऑफिस ऑफ आरजीहून राहुल गांधी असे करण्यात आले होते. राहुल गांधींनी अधिवेशनाच्या आरंभी मोदी सरकारच्या विरोधात ५ पुस्तिका जारी केल्या. त्यात १३ अजेंड्यांचा समावेश आहे.  

सात वर्षांनंतर काँग्रेसचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. ८३ वे महाधिवेशन १८ डिसेंबर २०१० मध्ये झाले होते. यंदाचे हे अधिवेशन राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखालील पहिलेच अधिवेशन ठरले आहे. या अगोदर काँग्रेसचे मोठे चिंतन संमेलन २०१३ मध्ये जयपूरमध्ये झाले होते. १९ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिलेल्या सोनिया गांधी यांच्या कार्यकाळात तीन महाअधिवेशने झाली. १३३ वर्षांच्या काँग्रेसच्या इतिहासात ८४ महाअधिवेशने झाली आहेत.  


काँग्रेस सर्वात कमकुवत असताना होणारे ६७ वर्षांतील हे पहिलेच महाअधिवेशन  
काँग्रेस सर्वात कमकुवत असताना होत असलेले हे  ६७ वर्षांतील पहिलेच महाअधिवेशन आहे. १९५१ मध्ये देशात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीनंतर गत ६७ वर्षांत काँग्रेस एवढी कमकुवत कधीही झाल्याचे पाहायला मिळाले नव्हते. जागांची संख्या किंवा मतदानाचा टक्का असो. काँग्रेस कमकुवत बनली आहे. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ३६४ जागा व ४४.९९ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती. १६ व्या लोकसभेत मात्र काँग्रेसचे ४८ खासदार आहेत. मतदानाचा टक्का १९.३ टक्के आहे. यापूर्वी काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी १९९९ मध्ये दिसली. तेव्हा १४४ जागा मिळाल्या होत्या. 

 

‘पंजा देशाला मार्गदर्शक’

पंजा देशाला एकत्र ठेवण्याचे काम करतो  असे महाअधिवेशनात राहुल म्हणाले, आम्ही भूतकाळाला विसरत नाहीत. आम्ही देशाला जोडण्याचे काम करू. पंजा काँग्रेस पक्षाचे प्रतीक आहे. देशाची एकजूट करणारे हे प्रतीक आहे. आपल्याला मार्ग दाखवतो. हाच पंजा देशाला प्रगतिपथावर घेऊन जाईल. मला येथे दोन भाषणे द्यायची आहेत. समारोपाला जास्त बोलेन.  

 

‘काँग्रेस जन हृदयात ’ 
सोनिया गांधी म्हणाल्या, आमचे अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना काँग्रेस लोकांच्या हृदयात वसते हे ठाऊक नव्हते. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातील पक्षाच्या कामगिरीवरून हे लक्षात घेता येईल. आम्ही सूडमुक्त व अहंकारमुक्त भारत बनवण्यासाठी संघर्ष करत आहोत. २०१४ मध्ये देण्यात आलेली आश्वासने म्हणजे केवळ नाटक होते, असे  सोनियांनी सांगितले.  

  

युवक आणि शेतकरी हवालदिल - राहुल गांधी 
- अधिवेशनाचे उद्घाटनपर भाषणात राहुल गांधी म्हणाले, 'येथे मला दोन भाषण करायचे आहे. समारोपच्या भाषणात आपली रणनीती काय असेल त्यावर बोलू. आपला पक्ष हा इतरांपेक्षा वेगळे काय करु शकतो त्यावरही चर्चा करु.'
- युवक आणि ज्येष्ठ नेते यांच्यात समतोल राहिल याचे संकेत राहुल गांधी यांनी दिले. ते म्हणाले, 'युवक पक्षाला पुढे घेऊन जातील. त्याचेवळी काँग्रेस ज्येष्ठांनाही विसरणार नाही. युवक आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाचे काम मी करेल.'

 

मोदी सरकारवर निशाणा 
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले,  'देशात सध्या एका व्यक्तीचे दुसऱ्यासोबत भांडण घडवून आणले जात आहे. फक्त एकमेकांबद्दल द्वेष पसरवला जात आहे. या परिस्थितीत देशाला फक्त काँग्रेसचा हाथ एकमेकांशी बांधून ठेवेल. आम्हाला सर्वांना मिळून देशाला एक ठेवायचे आहे. सोनियाजी आणि मनमोहनजी यांना धन्यवाद देतो. त्यांच्यासह सर्व नेत्यांनी देशाला एकत्र ठेवण्याचे काम केले आहे.'
- 'देशातील युवक आणि शेतकरी हे मोदींच्या धोरणामुळे भयभीत झाले आहेत. त्यांना या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. आपल्याला त्यांच्यासोबत उभे राहावे लागणार आहे.' 

आगामी रणनीती ठरवली जाणार... 

- महाअधिवेशनात पक्षाचा पुढील पाच वर्षांचा रोडमॅप आणि आगामी राजकारणाची रणनीती निश्चित केली जाणार आहे. या अधिवेशनात काँग्रेसचा फोकस नेत्यांवर नाही तर कार्यकर्त्यांवर राहाणार आहे. महाअधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेतील विशेष समितीची बैठक झाली. यामध्ये संचालन समिती सदस्य, काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष, काँग्रेसचे विविध राज्यातील आमदार  आणि नेते सहभागी होते. 


राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 
- देशामध्ये सध्या प्रत्येकाला एकमेकांविरोधात लढवले जात आहे. एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भांडण्यासाठी उभे केले जात आहे. 
या वातवरणातून देशाला फक्त हा 'हात' (काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हाताकडे इशारा करत)  विश्वास देऊ शकतो. हा हातच देशाला विकासाकडे घेऊन जाऊ शकतो. 
- तरुण कार्यकर्त्यांना पक्षातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे राहाणार आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. 
- राहुल गांधी यांनी अवघ्या 4 ते 5 मिनिटांच्या भाषणात देशाला फक्त काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते असा विश्वास व्यक्त केला. 
- हे उद्घाटनाचे भाषण असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी सर्व नेत्यांचे विस्तृत एकल्यानंतर समारोपाच्या भाषणात आपले विचार व्यक्त करणार असल्याचे म्हटले. 
- रविवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भाषणाने अधिवेशनाचा समारोप होईल. 

 

स्टेजवर एकही नेता नाही

- राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेत होत असलेल्या या राष्ट्रीय महाअधिवेशनाचे सर्वात मोठे वेगळेपण हे आहे की एकही नेता स्टेजवर नाही. सर्व नेते हे कार्यकर्त्यांसोबत खाली बसले आहेत. 

- राहुल गांधी, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, लोकसभेतील पक्षाचे नेते मल्लिकार्जून खरगे, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. 

 

काँग्रेसमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याचे प्रयत्न 
काँग्रेस अधिवेशनासाठी देशभरातून पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिल्लीला आले आहेत. या अधिवेशनाच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आगामी काळात कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीला  मोठ्या मजबुतीने समोरा जाण्यासाठी पक्षाची रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. 
- अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बेरोजगारी, गरीबी दुर करण्यासाठीचे प्रस्ताव मंजूर केले जाऊ शकतात. 

 

काँग्रेस विरोधीपक्षांच्या संपर्कात 
- काँग्रेसकडून विरोधीपक्षातील सर्व नेत्यांशी संपर्क केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधी यांनी विरोधीपक्ष नेत्यांसाठी डिनरचे आयोजन केले होते. यावेळी जवळपास 20 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. 
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विरोधीपक्षांची एक यूनायटेड फ्रंट तयार करण्याच्या तयारीत आहे. 
- भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधीपक्षांनी एकत्र येऊन लढावे असे प्रयत्न काँग्रेसचे सुरु आहेत. राहुल गांधी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. 

बातम्या आणखी आहेत...