आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फिडेलिटो\' यांची आत्महत्या; वडील होते क्रांतिकारी नेते, 40 वर्षे सत्ताधीश, 35 हजार महिलांशी संबंध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिडेल कॅस्ट्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी गुरुवारी सकाळी आत्महत्या केली आहे. - Divya Marathi
फिडेल कॅस्ट्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी गुरुवारी सकाळी आत्महत्या केली आहे.

क्यूबाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो यांचा मोठा मुलगा डियाज बालार्ट यांनी गुरुवारी सकाळी आत्महत्या केली आहे. क्यूबाच्या मीडियानुसार डियाज काही काळापासून नैराश्यात होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते. त्यातच त्यांनी गुरुवारी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. डियाज 68 वर्षांचे होते. ते दिसायला वडीलांसारखे होते, त्यामुळे त्यांना 'फिडेलिटो' देखील म्हटले जात होते. वडील फिडेल कॅस्ट्रो हे जगभारतील तरुणांचे आवडते व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या मुलाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने क्रांतीकारी विचारांच्या तरुणांना धक्का बसला आहे. 

 

क्रांतिकारी होते फिडेल कॅस्ट्रो 
एकेकाळी अमेरिकाला जेरीस आणणारे आणि क्युबाचे 40 वर्षे एकहाती सत्‍ता गाजवणारे माजी राष्‍ट्रपती फिडेल कॅस्ट्रो हे क्रांतिकारी होते.  त्यांचे 26 नोव्हेंबर 2016 ला वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले. DivyaMarathi.com सांगात आहे फिडेल यांच्‍या बद्दल खास माहिती...

 

35 हजार महिलांसोबत संबंध
- मार्च 2016 मध्ये अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा क्यूबा भेटीवर आले होते. मात्र त्यांनी 90 वर्षांच्या फिडेल कॅस्ट्रो यांची भेट घेतली नव्हती. 
- त्‍यांचे भाऊ राउल कॅस्ट्रो हे क्‍युबाचे विद्यमान राष्‍ट्रपती आहेत. कॉम्रेड फिडेल कॅस्ट्रो यांनी दीर्घकाळ एकहाती क्‍युबावर सत्‍ता गाजवली. या काळात त्‍यांनी एकूण 35 हजार महिलांसोबत शरीर संबंध केल्‍याचा दावा इऐन हॅल्पेरिन यांनी त्‍यांच्‍या माहितीपटात केला होता.

 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या क्रांतिकारी फिडेल यांच्याबद्दल... 

बातम्या आणखी आहेत...