आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुमार विश्वास यांनी मागितली अरुण जेटलींची माफी, माजी अर्थमंत्री अब्रुनुकसानीचा खटला मागे घेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुमार विश्वास म्हणाले होते, की आप नेते जे बोलले होते तेच मी सांगितले. - Divya Marathi
कुमार विश्वास म्हणाले होते, की आप नेते जे बोलले होते तेच मी सांगितले.

नवी दिल्ली - डीडीसीए मानहानी केसमध्ये कुमार विश्वास यांनी अरुण जेटलींची माफी मागितली आहे. जेटलींच्या वकिलांनी म्हटले, आहे की आम्ही त्यांच्या माफीचा स्वीकार केला आहे. दिल्ली हायकोर्टात मागील सुनावणीवेळी कुमार विश्वास म्हणाले होते, की अरविंद केजरीवाल आणि पक्षाच्या नेत्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी जेटलींविरोधात वक्तव्य केले   होते. विशेषम्हणजे केजरीवाल यांच्यासह काही आप नेत्यांनी आधीच जेटलींची माफी मागितली आहे. 

 

कोणते आरोप केले होते.. 
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह 5 आप नेत्यांनी 2015 मध्ये डीडीसीएमधील कथित घोटाळ्यावरुन अरुण जेटलींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यानंतर जेटलींनी दिवाणी आणि फौजदारी कायद्यानुसार अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. 
- कुमार विश्वास यांच्याआधी 4 आप नेत्यांनी जेटलींची माफी मागितली आणि त्यानंतर जेटलींनी खटला मागे घेतला होता. 

 

प्रकरण वाढवण्याची इच्छा नाही - कुमार विश्वास 
- 3 मे रोजी या खटल्याच्या सुनावणीला हजर झालेले कुमार विश्वास म्हणाले होते, 'अरुण जेटलींची माफी मागण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायचे आहे की केजरीवालांनी मला खोटे सांगितले होते का, की त्यांच्याकडे जेटलींच्या भ्रष्टाचाराशी संबंधित पुरावे आहेत.'
- 'मी जेटलींविरोधात जे वक्तव्य केले होते, ते केजरीवाल आणि इतर नेत्यांच्या वक्तव्याच्या आधारावरुन केले होते. हा खटला मागे घेण्यासाठी मला काही वेळ हवा आहे. वैयक्तिक पातळीवर हा खटला सुरु ठेवण्यात मला काही रस नाही. जर माझ्या वक्तव्याने जेटलींची प्रतिमा मलिन झाली असेल तर मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. परंतू पुन्हा सांगू इच्छतो की मी फक्त केजरी जे म्हणाले तेच सांगितले होते.'

 

काय आहे डीडीसीए अब्रुनुकसान प्रकरण? 
- 2015 मध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासह काही आप नेत्यांनी भाजप नेते अरुण जेटलींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांचा आरोप होता की जेटली 13 वर्षे दिल्लीच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते, या काळात त्यांनी भ्रष्टाचार केला होता. 
- आप नेत्यांनी अनेक दिवस जेटलींविरोधात सोशल मीडियावर कँपेन चालवले होते. या दरम्यान अरुण जेटलींनी हे सर्व आरोप फेटाळले होते. यानंतर त्यांनी अरविंद केजरीवाल, संजय सिंह, आशुतोष, कुमार विश्वास आणि राघव चड्डा यांच्याविरोधात 10-10 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. कुमार विश्वास वगळता इतर चार नेत्यांनी गेल्या जेटलींना माफीनामा लिहून दिला होता.

बातम्या आणखी आहेत...