आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली बंदला सुरुवात, सीलिंगच्या विरोधात दोन दिवस व्यापार-व्यवहार ठप्पं

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सीलिंग विरोधात कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) संघटनेने 48 तासांचा बंदला सुरुवात केली आहे. बंदमुळे दिल्लीतील 2500 बाजारपेठांमध्ये व्यवहार ठप्प झाला आहे. शहरातील 7 लाखांपेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली आहेत. त्यासोबतच सीलिंग विरोधात बाजारपेठांमध्ये आंदोलनही सुरु आहे. शुक्रावरी या मुद्यावर राज्यसभेत गदारोळही झाला. दरम्यान दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत डीडीएच्या बैठकीत सीलिंगमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

 

काय सवलत दिली?
- दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते आणि डीडीए सदस्य विजयेंद्र गुप्ता यांनी सांगितले की सीलिंगमध्ये सूट देण्यासाठी मास्टर प्लॅन 2021 मध्ये बदल करण्यासाठी एकमत झाले आहे.  तीन मोठे निर्णय घेण्यात येणार आहेत. 
- यामध्ये फ्लोअर एरिया रेशियो (एफएआर) मध्ये बदलाला मंजूरी देण्यात आली आहे. 
- फ्लोअर एरिया रेशियो (एफएआर) 180 वरुन 300 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
- एफएआर मध्ये वाढ झाल्यास बेसमेंट सीलिंगच्या कक्षेबाहेर होईल. 
- त्यासोबतच कन्व्हर्जन चार्जवरील पॅनल्टी 8 पट कमी केली आहे. 


कॅनॉट प्लेससह चांदनी चौक बाजार बंद 
- चांदनी चौक, सदर बाजार, चावडी बाजार, खारी बावली, नया बाजार, भागीरथ प्लेस, कॅनॉट प्लेस, लाजपतरॉय मार्केटसह दिल्लीतील सर्व प्रमुख बाजार बंद आहेत. 
- 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील 8 लाख दुकाने आणि 1.5 लाख कारखाने पूर्णपणे बंद राहाणार आहेत. 
- या बंदला 750 ट्रेड असोसिएशन्स आणि 20 पेक्षा जास्त इंडिस्ट्रिय एरियांनी पाठिंबा दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...