आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवाना नसलेल्या अाैषध कंपन्यांवर कारवाईसाठी आता गुप्तचर विभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात बनावट व अपरिणामकारक अाैषधींची माेठ्या प्रमाणावर विक्री हाेत अाहे. त्यामुळे अशा अाैषधी व त्या बनवणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाईसाठी सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्राेलर अाॅर्गनायझेशनने (सीडीएससीअाे) प्रथमच गुप्तचर विभागाची (इंटेलिजन्स सेल) स्थापना केली अाहे. या विभागाला छापे टाकून कारवाईचे अधिकारही देण्यात अाले अाहेत.  


ड्रग्ज कंट्राेलर जनरल अाॅफ इंडियाच्या अादेशानुसार १० सदस्य असलेल्या या सेलला तक्रारीच्या अाधारावरही कारवाई करण्याचे अधिकार अाहेत. गत ११ जुलै राेजी पुदुच्चेरीत अशाच एका अाैषधनिर्मात्या कंपनीवर छापा टाकण्यात अाला. सध्या प्रयाेगशाळेत चाचणी सुरू असलेल्या अाैषधाची या कंपनीत निर्मिती केली जात हाेती. कंपनीला हे अाैषध बनवण्यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारनेही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ही कारवाई झाली. हा विभाग गुप्तचर विभागासारखे काम करत अाहे, असे डाॅ. एस. ईश्वर रेड्डी (ड्रग्ज कंट्राेलर जनरल अाॅफ इंडिया) यांनी सांगितले.  देशातील किती प्रकारच्या कंपन्या अाैषधी बनवत अाहेत व किती प्रकारच्या अाैषधी देशात बनत अाहेत याची अचूक माहिती कुणाकडेही नाही. प्रत्येक राज्य वेगवेगळे परवाने देते व त्यासाठी काेणतीही केंद्रीय यंत्रणादेखील नाही. तथापि, कंपन्यांना त्या काेणत्या अाैषधांची व किती प्रमाणात निर्मिती करत अाहेत? याची माहिती अाॅनलाइन अपडेट करण्याचे निर्देश देण्यात अालेले अाहेत.

बातम्या आणखी आहेत...