आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Did The Establishment Of The Taliban In Hinduism Begin? Congress Leader Tharoor's Question

हिंदू धर्मामध्ये तालिबानची स्थापना करण्यास सुरुवात झाली का? काँग्रेस नेते थरूर यांचा प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवनंतपुरम / नवी दिल्ली - हिंदू पाकिस्तान म्हणून देशाचे वर्णन करणारे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी बुधवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हिंदू धर्मात आता काय तालिबान स्थापन करण्यास सुरुवात झाली का? असा संतप्त प्रश्न उपस्थित केला.

 

थरूर यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा प्रश्न त्यांनी अधिवेशनादरम्यान शून्य प्रहरी चर्चेत मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी नवे वादग्रस्त विधान केले आहे. तुम्हाला एक भारत, एक धर्म बनवायचा आहे. याचाच अर्थ तुम्ही देशाचे तुकडे पाडू इच्छिता. विविध समुदायाचे लोक एकत्र नांदत असताना असे तुकडे कसे शक्य होतील ? असे थरूर यांनी म्हटले आहे. ते बुधवारी संसद परिसरात पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी थरूर यांनी केरळमधील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या(यूडीएफ) वतीने मंगळवारी आयोजित निदर्शनादरम्यानही आपले मत मांडले होते.

 

ते म्हणाले , मला ते पाकिस्तानात पाठवू इच्छितात. त्यांच्यासारखा हिंदू नाही व त्यामुळे मला भारतात राहण्याचा अधिकार नाही, हे ठरवण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले ? भाजप हिंदू राष्ट्राबद्दल बोलते. ही संकल्पना खरोखरच धोकादायक आहे आणि ती देशाला उद्ध्वस्त करेल. त्यांना हिंदू धर्मात तालिबान स्थापन करायचा आहे का ? असा प्रश्न त्यांनी केला आहे.

 

'माझ्या माघारीचा प्रश्नच नाही'
केरळातील माझ्या कार्यालयावर हल्ले करणाऱ्यांनी अगोदर माफी मागितली पाहिजे, असे सांगून 'हिंदू पाकिस्तान' च्या वक्तव्यावरून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पवित्रा थरूर यांनी घेतला आहे.

 

संसदेत वातावरण तापले : थरूर यांच्या कार्यालयावरील हल्ल्याच्या प्रकरणात कायदा आपले काम करत असल्याचे सांगून संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी भाजपला या प्रकरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर हा हल्ला राज्य सरकार प्रायोजित असल्याचा दावा केला. त्यानंतर काही सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला. अनंत कुमार संसदेची दिशाभूल करत असल्याचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले. वाद वाढल्याने अखेर पंतप्रधानांना मध्यस्थी करावी लागली.

 

काँग्रेसने अंतर राखले
थरूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांपासून काँग्रेसने स्वत: ला दूर ठेवले आहे. या वादानंतर भाजपबद्दल वक्तव्य करताना शब्द जपून वापरावेत, अशी ताकीद काँग्रेसच्या नेत्यांना हायकमांडकडून देण्यात आली आहे.

 

वादंग कशामुळे ?
भाजपसंबंधी थरूर यांनी केलेले विधान वादाच्या मुळाशी आहे. भाजप आगामी निवडणुकीत विजयी झाल्यास राज्यघटनेची फेरमांडणी केली जाईल. त्याचबरोबर 'हिंदू पाकिस्तान'ची निर्मिती केली जाईल, असा आराेप त्यांनी केला होता. सोमवारी भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी थरूर यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता.

बातम्या आणखी आहेत...