आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या या महिला नेत्याला बरखास्त करण्याची BJP ने केली मागणी, PMवर केले वादग्रस्त ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्या स्पंदना. - Divya Marathi
दिव्या स्पंदना.

नवी दिल्ली - ट्विटरवरुन मोदी सरकारच्या धोरणाचा सातत्याने समाचार घेणाऱ्या दिव्या स्पंदना उर्फ रम्या भाजपच्या निशाण्यावर आल्या आहेत. रविवारी (4 जानेवरी) पंतप्रधान नरेंद्र मोदींची बंगळुरुमध्ये रॅली झाली आणि त्यांनी कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला. त्यांच्या या हल्ल्याला रम्या यांनी ट्विटरवरुन उत्तर दिले. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हाराव यांच्यासह आयटी सेल हेड अमित मालवीय यांनी रम्या यांचे ट्विट पंतप्रधानांचा अवमान करणारे असल्याचे म्हटले. त्यालाही रम्या यांनी उत्तर दिले.  

 

कोण आहे रम्या 
- साऊथची 34 वर्षीय अॅक्ट्रेस दिव्या स्पंदना उर्फ रम्याने 2012 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
- अॅक्ट्रेस रम्या यांनी 2013 मध्ये कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढली आणि त्या संसदेत पोहोचल्या. 
- त्यांनी जेडीएसचे उमेदवार सीएस पंट्टाराजू यांचा पराभव केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र मोदी लाटेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 
- रम्या यांचे दिव्या @Divya Spandana/Ramya नावाने ट्विटर अकाऊंट आहे. त्यांना ट्विटरवर 5 लाख 44 हजार पेक्षा जास्त लोक फॉलो करतात. 
- कन्नड चित्रपटातून डेब्यू करणाऱ्या रम्या यांनी तेलगू, तामिळ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

 

'विकास वेडा झाला' कँपेन
- माजी खासदार रम्या सोशल प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अॅपवर येताच काँग्रेसमध्ये कमालीचा बदल झालेला पाहायला मिळाला आहे. 
- गुजरात दौऱ्यात राहुल गांधींनी भाजपवर टीका करताना म्हटले होते, 'विकास पागल झाला आहे'. राहुल यांचे हेच वाक्य काँग्रेसच्या डिजिटल टीमने कॅच केले आणि याचे जोरदार कँपेन करण्यात आले. 'विकास पागल झाला' हे वाक्य गुजरात निवडणुकीदरम्यान प्रत्येक भाषेतून भाजपवर बरसत होते. 
- वास्तविक हे वाक्य गुजराती भाषेतून होते. एका 20 वर्षीय सागर सावलिया नावाच्या मुलाने गुजरात बसच्या खराब आवस्थेवर आणि व्यवस्थेवर फेसबुकवर हे वाक्य टाकले होते. तेव्हापासून काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमने भाजपविरोधातील प्रचारात याचा वापर केला आहे. 
- 'विकास पागल झाला आहे', या वाक्याने ट्विटर, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधण्यासाठी याचा पुरेपूर वापर सुरु केला.

 

रम्या आयटी सेलच्या प्रमुख
- लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया स्ट्रॅटेजीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले होते.
- या बदलाचा सर्वात मोठा भाग म्हणजे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांच्या ऐवजी सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या रम्या यांना आयटी सेलची जबाबदारी देण्यात आली. 
- सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर पक्षाला मजबुतीने प्रेझेंट करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी हा निर्णय घेतला होता.
- तीन वेळा काँग्रेस खासदार राहिलेले हुड्डा जवळपास 5 वर्षांपासून आयटी सेल व सोशल मीडिया टीमची धुरा वाहात होते. 
- राहुल गांधी यांनी केलेला बदल पक्षाला ऊर्जा देणार ठरत असल्याचे मानले जात आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, दिव्या उर्फ रम्या यांचे फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...