आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Due To Petrol And Diesel, The State's Additional Earnings Of Rs 18,700 Crore In 2 Months

पेट्रोल-डिझेलमुळे राज्यांची 2 महिन्यांत 18,700 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सलग १५ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरांत वाढ झाली. दिल्लीत पेट्रोल १५ पैशांनी महागून ७८.२७ रुपयांवर गेले. डिझेलही ११ पैशांनी वाढून ६९.१७ रुपयांवर पोहोचले. १४ मेपासूनच्या १५ दिवसांत पेट्रोल ३.६४ रुपये आणि डिझेल ३.२४ रुपयांनी महागले आहे.


दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे राज्यांना २ महिन्यांपेक्षा   कमी वेळेत १८,७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा झालेला आहे. राज्य सरकारांकडे पेट्राेल २.६५ रुपये आणि डिझेल २ रुपयांपर्यंत स्वस्त करण्यास वाव आहे. यामुळे करांतून मिळणारे उत्पन्नही घटणार नाही. सोमवारी जारी झालेल्या एसबीआयच्या ‘इकोरॅप’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार केंद्राने अबकारी शुल्क एक रुपयाने घटवल्यास महसूलात १०,७२५ कोटींचे नुकसान होईल. राज्यांना फटका बसणार नाही.


या अहवालासाठी १९ राज्यांतील पेट्रोल-डिझेलच्या दरांचे विश्लेषण करण्यात आले. इंधनाचा ९३% खप याच राज्यांत होतो. अहवालानुसार, वित्तवर्ष २०१७-१९ मध्ये या राज्यांची अतिरिक्त कमाई १८,७२८ कोटींवर गेली आहे. कच्चे तेल १ डॉलरने महागल्यास राज्यांची कमाई २,६७५ कोटींनी वाढते. गेल्या गुरुवारी नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीवकुमार म्हणाले होते की, राज्यांकडे दरकपातीस वाव आहे. राज्य टक्क्यांत व्हॅट आकारतात. यामुळे दरवाढीमुळे त्यांचे कर संकलन वाढते.

 

.. तर पेट्रोल ५.७५ रूपयांनी स्वस्त होऊ शकते
सध्या केंद्र सरकारच्या अबकारी शुल्कावर व्हॅटही आकारला जातो. केंद्रीय कर वगळून फक्त बेस प्राइझवर व्हॅट लावल्यास पेट्रोल ५.७५ रुपये आणि डिझेल ३.७५ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. मात्र यामुळे राज्यांच्या महसूल ३४,६२७ कोटी रुपयांनी घटेल. ते राज्यांच्या तुटीचे ०.२% इतके असेल.

बातम्या आणखी आहेत...