आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज आठ तासांपेक्षा कमी झोप होत असल्याने मुलांच्या अभ्यासावर परिणाम, विद्यार्थ्यांना 15 गुण मिळतात कमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अकरा ते १५ वर्षे वयोगटातील मुलांना आठवड्यातील ५८ तास झोप आवश्यक आहे. पण अभ्यासाच्या तणावाखाली मुले झोपेशी तडजोड करत असल्याचे चित्र दिसते. या मुलांमध्ये ८३ टक्के ते ९२ टक्क्यांपर्यंत निद्रानाश जाणवत आहे. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर व आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. 


कमी झोप घेतल्याने गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयात मुलांना सरासरी १५ गुण कमी मिळतात. तसेच त्यांच्यात नैराश्य आणि तत्काळ स्वभाव बदलण्यसारखी समस्या वाढत आहे. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयाच्या पल्मनरी क्रिटीकल केअर अँड स्लीप मेडीसिन आणि फिजिओलॉजी विभागाने यासंदर्भात ५०१ शालेय विद्यार्थ्यांवर संशोधन केले. यात २९५ विद्यार्थी आणि २०६ विद्यार्थिनींचा समावेश होता. मुलांना दोन गटात विभागण्यात आले. यात ११ ते १२ वर्ष वय असलेल्या विद्यार्थ्यांचा (पौगंड अवस्था) एक गट तर  १३ ते १५ वर्ष वय (किशोरवयीन) असलेला दुसरा गट करण्यात आला. पहिल्या गटातील विद्यार्थ्यांची संख्या १८३ तर दुसऱ्या गटातील संख्या ३१८ होती. मुलांना निवडक प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तराच्या आधारावर निष्कर्ष काढण्यात आला. संशोधन टीमचे प्रमुख डॉ. जे.सी. सुरी म्हणाले की, पौगंड अवस्थेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत किशोरवयीन विद्यार्थी कमी झोप घेतात. याचा परिणाम त्यांच्या सरासरी गुणांवर पडतो. निष्कर्षानुसार ३४ टक्के पौगंडा अवस्थेतील मुले सोमवार ते शुक्रवार दरम्यान झोप येत असल्यास झोपू शकतात. किशोरवयीन मुलांमधील ही आकडेवारी ३० टक्क्यांपर्यंत आहे. अभ्यासाच्या ताणामुळे २७ टक्के पौगंड अवस्थेतील मुले आणि ३१ टक्के किशोरवयीन मुले झोप घेऊ शकत नाहीत. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, वयोमानानुसार निद्रानाशाचा असा होतो परिणाम...

बातम्या आणखी आहेत...