आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदार म्हणाल्या, मॉब लिंचिंगमागे आर्थिक असमानता; त्यावर केंद्राचा वेगळा कायदा नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात गोंधळानेच झाली. विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी मॉब लिंचिंगचा मुद्दा उपस्थित केला. दोन्ही सभागृहांत या मुद्द्यावर जोरदार गोंधळ झाला. त्याशिवाय अॅट्रॉसिटी कायदा, शेतकऱ्यांचे मुद्दे आणि महिला आरक्षण विधेयकावरूनही गोंधळ झाला.  


जमावाद्वारे होत असलेल्या हत्यांबाबत विरोधी नेते म्हणाले की, देशभरात निष्पाप लोकांना फक्त संशयाच्या आधारावर मारले जात आहे, पण सरकार काहीही करत नाही. विरोधकांनी एक वेगळा कायदा करण्याची मागणी केली, ती केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी स्पष्टपणे फेटाळून लावली. या मुद्द्यावर भाजप खासदार मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, मॉब लिंचिंगच्या वाढत्या प्रकरणांचे कारण आर्थिक असमानता हे आहे. बंगालमधील माणिक राय आणि केरळचा आदिवासी युवक मधूचे उदाहरण देत त्या म्हणाल्या की, ‘मॉब लिंचिंगमागे आर्थिक कारणे आहेत. रायला कोंबडी चोरण्याच्या मधूला चोरीच्या संशयावरून मारण्यात आले.’ सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारीच मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांना कायदा बनवण्यास सांगितले होते. 

 

सरकारने किती नोकऱ्या दिल्या यावर मंत्री म्हणाले-जगात सर्वात कमी बेरोजगारी भारतातच  
राज्यसभेत समाजवादी पक्षाचे खासदार सुखराम यादव यांनी विचारले की, ४ वर्षांत किती लोकांना रोजगार दिला? त्यावर केंद्रीय मंत्री संतोष गंगवार म्हणाले की, जगात सर्वात कमी बेरोजगारी भारतातच आहे. नोव्हेंबर २०१६ नंतर रोजगारावर परिणाम झाला आहे याचा डेटा २ महिन्यांत येईल. 

 

राज्यसभेत सर्व २२ भाषांत सदस्य आपले मुद्दे मांडू शकतील  
राज्यसभेत आता सदस्य डोगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी भाषेतही बोलू शकतील. त्याचबरोबर सभागृहात घटनेच्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट सर्व २२ भाषांत अनुवाद करण्याची व्यवस्था सुरू झाली आहे. आतापर्यंत सदस्य फक्त १७ भाषांतच बोलू शकत होते.  


२०१४-१६ दरम्यान देशात अत्याचाराची १,१०,३३ प्रकरणे  
केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितले की, २०१४ ते २०१६ दरम्यान अत्याचाराची १,१०,३३ प्रकरणे समोर आली आहेत. त्यात २०१४ त ३६,७३५, २०१५ त ३४,६५१ आणि २०१६ मध्ये ३८,९४७ प्रकरणे नोंद झाली आहेत. २०१४ मध्ये ३,३९,४५७ ,२०१५ मध्ये ३,२९,२४३ आणि २०१६ मध्ये ३,३८,९५४ महिलांशी संबंधित गुन्हे दाखल झाले.  


मे-जूनमध्ये पुराचे १००६ बळी
केंद्रीय मंत्री किरण रिजिजूंनी एका प्रश्नवर म्हण ाले की, या वर्षी मे-जूनमध्ये वादळ, पुरामुळे १००६ बळी गेले आहेत. ६३५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक २५२ बळी उप्रमध्ये गेले. ओडिशात ९७, पश्चिम बंगाल व बिहारमध्ये प्रत्येकी ७४, आंध्र-७३, कर्नाटक-केरळमध्ये प्रत्येकी ७१ जण ठार झाले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, मॉब लिंचिंगमागे भाजपशी संबंधित संघटना...

 

 

 

बातम्या आणखी आहेत...