आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नीरव-माल्ल्यासारख्या फरार आरोपींची संपत्ती जप्त करता येणार, आर्थिक गुन्हे अध्यादेशाला मंजूरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आर्थिक गुन्हे करुन विदेशात पळून जाणाऱ्या हायप्रोफाइल गुन्हेगारांविरोधात सरकार कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. शनिवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत अशा लोकांची संपत्ती जप्त करण्यासंबंधीच्या आर्थिक गुन्हे अध्यादेश 2018 ला मंजूरी देण्यात आली. यामुळे विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चौकसी सारख्या आरोपींविरोधात कारवाई करणे शक्य होणार आहे.

 

का आणला सरकारने अध्यादेश 
- केंद्र सरकारने 12 मार्च रोजी लोकसभेत फरार आर्थिक गुन्हेगारी बील 2018 सादर केले होते, मात्र गदारोळामुळे हे बील मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे सरकारने आता अध्यादेश आणला आहे. 

 

कोणाविरोधात कारवाई करता येणार? 
- अध्यादेशातील तरतुदीनुसार, आर्थिक घोटाळे करून पैसे परत करण्यास नकार देणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांविरोधात यामुळे कारवाई करता येणार आहे. 
- आर्थिक गुन्ह्यांमध्ये ज्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 
- 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त बँकेची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांविरोधात. 
- फरार आर्थिक गुन्हेगारांची संपत्ती जप्त करुन त्याच्या विक्रीतून वसूली केली जाऊ शकते.

 

फरार कोण घोषित करणार ? 
- अध्यादेशातील तरतुदीनुसार, डायरेक्टर किंवा डिप्टी डायरेक्टर स्तरावरील अधिकारी एखाद्या आरोपीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करेल. यासाठी स्पेशल कोर्टात याचिका दाखल करावी लागेल. यात आरोपीविरोधात पुरेसे पुरावे द्यावे लागतील.  

बातम्या आणखी आहेत...