आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासदर 7-7.5% राहाण्याची शक्यता, अरुण जेटलींनी सादर केले आर्थिक सर्वेक्षण; महागाई मोठे आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटलींनी अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या सर्वेक्षणात आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये विकासदर 7 ते 7.5 टक्के राहाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सध्याच्या आर्थिक वर्षात 2017-18 मध्ये जीडीपी ग्रोथ 6.75 टक्के राहाण्याची शक्यता आहे. 

 

- आर्थिक वर्ष 2018 मध्ये जीडीपी ग्रोथ 6.75% पुढे राहाण्याची शक्यता आहे. 
- आर्थिक वर्ष 2019 मध्ये जीडीपी ग्रोथ 7 ते 7.5% राहाण्याची शक्यता आहे. 
- आर्थिक वर्ष 2018 मध्ये सर्व्हिस ग्रोथ 8.3% राहाण्याची शक्यता आहे. 
- कृषि क्षेत्राचा विकासदर 2.1% राहाण्याची शक्यता आहे. 
- आर्थिक वर्ष 2019 मध्ये क्रूड ऑइलच्या किंमतीमध्ये 12% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 

हे सर्वेक्षण देशातील आर्थिक स्थितीची वर्तमान स्थिती आणि सरकारने उचलेल्या पावलांचा एकूण परिणाम दर्शवते. आर्थिक सर्वेक्षणाआधी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, '2018 मध्ये जीडीपी 2017 च्या तुलनेत चांगला राहिल.' 

 

निर्यातदरात वाढीची शक्यता 
- आर्थिक सर्वेक्षणानुसार निर्यात दर सलग दोन वर्षे निगेटिव्ह राहिल्यानंतर 2016-17 मध्ये पॉझिटिव्ह दिसत आहे. निर्यातीचा हाच दर 2017-18 मध्ये अधिक वेगवान होण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...