आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम प्रकाश रावत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त; 23 जानेवारीला स्वीकारणार पदभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओम प्रकाश रावत हे मध्य प्रदेश कॅडरचे 1977 च्या बॅचचे अधिकारी आहेत. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
ओम प्रकाश रावत हे मध्य प्रदेश कॅडरचे 1977 च्या बॅचचे अधिकारी आहेत. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- निवडणूक आयुक्त ओम प्रकाश रावत हे देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त होणार आहेत. २३ जानेवारीला ते पदभार स्वीकारणार आहेत. ते निवृत्त होणाऱ्या ए. के ज्‍योती यांचा पदभार स्वीकारणार आहेत. अशोक लवासा यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

 

रावत ऑगस्ट 2015 मध्ये झाले होते निवडणूक आयुक्त

ओम प्रकाश रावत हे 1977 च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी आहेत. देशाचे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची ऑगस्ट 2015 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र आणि राज्य पातळीवर त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव म्हणून कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यांनी 1993 साली संरक्षण मंत्रालयाचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...