आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यसभेच्या 59 जागांसाठी 23 मार्चला मतदान, यातील सर्वाधिक 10 जागा उत्तर प्रदेशातील

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राज्यसभेच्या 59 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी याची घोषणा केली. निवडणूक आयोगानुसार, उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 12 मार्च ही शेवटची तारीख राहील. 15 राज्यांतील 57 जागांवरील उमेदवारांचा कार्यकाळ एप्रिल-मे मध्ये समाप्त होत आहे. केरळमधील खासदार वीरेंद्र कुमार आणि उत्तर प्रदेशातील खासदार मायावती यांनी राजीनामा दिल्यामुळे या जागांवर देखील निवडणूक होणार आहे. यावेळी घेण्यात येणाऱ्या निवडणूकीत उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक 10 जागांवर निवडणूक होणार आहे. भाजपला येथे आधिक फायदा मिळण्याची शक्यता आहे.


कोणाचा कार्यकाळ संपणार...?
- राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या 57 सदस्यांमध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, धर्मेंद्र प्रधान, जेपी नड्डा, थावरचंद गहलोत आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे.
- याशिवाय बसपा प्रमुख मायावती यांच्या जागेवर देखील निवडूक होणार आहे. त्यांनी गेल्यावर्षी जुलैमध्ये नाराज होऊन राज्यसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता.


उत्तर प्रदेशातील सर्वाधिक जागा...
पुढील महिन्यात राज्यसभेच्या ज्या जागांसाठी निवडूक होणार आहे, त्यात उत्तर प्रदेशच्या सर्वाधिक 10 जागांचा समावेश आहे. यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमधील 6-6 जागी आणि पश्चिम बंगल आणि मध्य प्रदेशात 5-5 जागी, गुजरात आणि कर्नाटकात 4-4 जागांसाठी, तर आंध्रप्रदेश, तेलंगाना, ओडिसा, राजस्थानच्या 3-3 जागी निवडणूक होणार आहे. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये 2 जागी तर छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या प्रत्येकी 1 जागेवर राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे.


केरळच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक...
केरळच्या एका राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. येथील खासदार विरेंद्र कुमार यांनी डिसेंबरमध्ये राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजिनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2022 पर्यंत होता.


उत्तर प्रदेशातून कोण-कोण निवृत्त होणार...?
- उत्तर प्रदेशातील 10 पैकी 9 जागांवरील खासदार 2 एप्रिलला निवृत्त होणार आहे. यात जया बच्चन (सपा) आणि प्रमोद तिवारी (काँग्रेस) यांचा देखील समावेश आहे. एक जागा मायावती यांनी राजीनामा दिल्यामुळे रिकामी झाली आहे.


राज्यसभेत सर्वात मोठी भाजपा....
गुजरातमध्ये राज्यसभेसाठी ऑगस्ट 2017 मध्ये निवडणूक झाल्यानंतर 58 जागांसह भाजप राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष बनला होता. सध्या राज्यसभेत काँग्रेसच्या 57 जागा आहेत.

बातम्या आणखी आहेत...