आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशातील प्रत्येक गावात वीज हा ऐतिहासिक दिवस : पंतप्रधान नरेंद्र मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर मंत्री पीयूष गोयल यांनी दोन छायाचित्रे जाहीर केली. त्यात सर्व गावांपर्यंत वीज पोहोचल्यानंतर देश कसा उजळला हे दाखवले. मात्र लोकांनी त्यांना ट्रोलही केले. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर मंत्री पीयूष गोयल यांनी दोन छायाचित्रे जाहीर केली. त्यात सर्व गावांपर्यंत वीज पोहोचल्यानंतर देश कसा उजळला हे दाखवले. मात्र लोकांनी त्यांना ट्रोलही केले.

नवी दिल्ली - देशातील सर्वात शेवटच्या गावापर्यंत रविवारी वीज पोहोचली आहे, असा दावा करणारे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मणिपूरचे लेइसांग गाव आता वीज केंद्राशी जोडले गेलेले अखेरचे गाव ठरले. २८ एप्रिल हा देशासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. त्यामुळे देशातील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे. सरकारी माहितीनुसार ५ लाख ९७ हजार ४६४ गावांपर्यंत वीज पोहोचली आहे. मोदी सरकारने सत्तासूत्रे हाती घेतली. तेव्हा १८ हजार ४५२ गावे अंधारात होती. ती आजघडीस उजळली आहेत.  


ग्रामीण वीज महामंडळाचे म्हणणे मात्र वेगळे आहे. देशातील सात कोटी पाच लाख घरांपर्यंत वीज पोहोचणे बाकी असल्याचा दावा महामंडळाने केला आहे. रविवारी याबाबत महामंडळाचे व्यवस्थापक विजयकुमार मोहंती म्हणाले, वीज जोडणी घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. लोकांनी वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सरकारने मार्च २०१९ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  

 

देशातील शेवटच्या गावात  राहतात फक्त ६५ लोक  
पॉवरग्रीडशी जोडल्या गेलेल्या देशातील शेवटचे गाव लेइसांगमध्ये १९ कुटुंबे व एकूण ६५ लोकांचे वास्तव्य आहे. त्यात ३१ पुरुष व ३४ महिला आहेत. हे गाव अत्यंत दुर्गम आहे. त्यामुळे वीजपुरवठा करण्यासाठी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना जास्त कष्ट घ्यावे लागले. काही गावांपर्यंत डोक्यावरून किंवा खांद्यावरून वीज उपकरणे वाहून न्यावी लागली. हे स्वप्न साकार करण्यासाठी अथकपणे काम करणाऱ्या सर्वांना माझा सलाम, असे मोदींनी म्हटले आहे.  

 

मोदींनी २०१५ मध्ये १००० दिवसांचे  उद्दिष्ट ठेवले होेते, ९८७ दिवसांत ते पूर्ण  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१५ रोजी लाल किल्ल्यावरून १ हजार दिवसांत अंधारात बुडालेल्या देशातील १८ हजारांहून अधिक गावांना उजळवू टाकू असे जाहीर केले होते. त्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू केली होती. ही योजना ९८७ दिवसांत पूर्ण झाली आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर अपारंरिक उर्जेवरही भर दिला. पहिल्याच वर्षात सौर ऊर्जेची आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन केली. त्यात फ्रान्ससह अनेक पुढारलेले देश सहभागी झाले आहेत. अलीकडेच ब्रिटननेही संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...