आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांनी केली भारतीय राजकारणाची प्रतिमा मलिन, अर्थमंत्री अरुण जेटली यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फ्रान्सचे राष्ट्रप्रमुख इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा नामोल्लेख करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतातील राजकारणाची प्रतिमा जगभरात मलिन केली आहे.

 

राफेल सौद्याबाबत अद्याप काहीही करार झाला नसल्याचे मॅक्रॉन यांनी सांगितल्याचा दावा राहुल यांनी लोकसभेतील भाषणादरम्यान केला होता. फ्रान्सच्या प्रमुखांशी वैयक्तिक चर्चा झाली होती. त्यात मॅक्रॉन यांनी सौदा झाला नसल्याचे म्हटले आहे, असे राहुल यांनी सांगितले. त्यामुळे राहुल यांची विश्वासार्हता आणखी घसरली आहे. त्यांची स्वत:ची प्रतिमा डागाळली. त्याद्वारे भारतीय राजकारणाची प्रतिमाही डागाळली आहे, असे जेटली यांनी सांगितले. जेटली यांनी शनिवारी फेसबुकवर केलेल्या पोस्टवर ही माहिती दिली.

 

राहुल गांधी यांनी राफेल सौद्याबाबत वास्तवाकडे दुर्लक्ष करून बेछूट आरोप केले. अशा प्रकारच्या विषयांबद्दल बोलताना हे मुद्दे राष्ट्रीय हिताचे आहेत, याचे भान सुटता कामा नये. त्याची गोपनीयता भंग होणे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, असा इशारा जेटलींनी दिला. दरम्यान, राज्यघटनेत बदल करण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही. मात्र राहुल यांच्या आजींनी एकदा तो केला होता. त्यात त्यांनाही यश आले नव्हते, असा टोला जेटलींना लगावला. राहुल गांधी यांनी शुक्रवारी अविश्वास प्रस्तावाच्या वेळी मोदींची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते आपल्या आसनावर गेल्यानंतर त्यांनी सहकारी सदस्यांकडे बघून डोळा मारला होता. त्यावरून मोदींनी त्यांच्यावर टीका केली होती.

 

गांभीर्य दिसले नाही
सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडणे ही एक गंभीर बाब आहे. परंतु शुक्रवारी मोदी सरकारच्या विरोधातील प्रस्तावात गांभीर्य दिसून आले नाही. सामान्यपणे असा प्रस्ताव मांडताना त्याची धुरा अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांकडे असते. मात्र तसे या वेळी दिसून आले नाही, असे जेटली यांनी म्हटले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...