आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतर वाहनांना लागलेल्या आगीत 3 जण जिवंत जळाले, चिमुकल्यासह 4 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. - Divya Marathi
या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.

इंदूर- मध्य प्रदेशातील धारमध्ये भीषण अपघातात 3 जण जिवंत जळाले. या अपघातात चिमुकल्यासह 4 जणांचा मृत्यू झाला. ट्रक व बाईकची धडक झाल्यावर बाईकमधून पेट्रोल सांडल्यानंतर ट्रकला आग लागली. या घटनेत दुचाकीवरील महिला, पुरुष आणि एक चिमुकला ट्रकच्या पुढच्या चाकात अडकले आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. तर ट्रक चालकाने आणि क्लिनरने पळ काढला. घटनेनंतर स्थानिकांनी कळवल्यावर पोलिस आणि अग्निशामक दल घटनास्थळी आले.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार इंदूरच्या दिशेने चालला होता. धार जिल्ह्यातील गुजरी गावाजवळील गणेश घाटजवळ त्याने ट्रकला धडक दिली. अपघातानंतर ते ट्रकच्या पुढच्या चाकात अडकले. त्याचवेळी दुचाकीतून पेट्रोलची गळती झाली आणि अपघाताने उडालेल्या ठिणगीने आग लागली. या आगीत दुचाकीवरील तिघांचा होळपळून मृत्यू झाला.

 

 

4 तासापूर्वीच आणखी एका अपघातात एकाचा मृत्यू
- ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच ठिकाणी आणखी एक अपघात झाला होता. या अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला होता. 
- गणपती घाट परिसरात वारंवार अपघात होत असून प्रशासन याची दखल घेत नसल्याने संतप्त नागरिकांनी यावेळी आंदोलनही केले.  

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...