आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या कार्यक्रमात खिसे कापण्यासाठी विमानाने जात, नंतर एसी रेल्वेतून परत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी देशभरात खिसे कापण्याचा उद्योग करणाऱ्या एका टोळीचा शोध लावला आहे. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह एका साथीदारास अटक केली आहे. यासाठी ते नियोजन करत असत.  इंटरनेट व वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीवरून कोणत्या शहरात मोठा कार्यक्रम होत आहे हे शोधून काढत. तेथे प्रवेश मिळवण्यासाठी आगाऊ विमानाच्या तिकिटांची नोंदणी करत असत. त्यानंतर ठरलेल्या विमानाने त्या शहरात जात असत. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर लोकांचे मोबाइल व इतर किमती ऐवज लुटल्यानंतर वातानुकूलित रेल्वेतून परतीचा प्रवास करत असत. त्यांनी ईस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस महामार्गाच्या उद््घाटन कार्यक्रमात हात साफ केला. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होेते.  मोदींची लोकप्रियता पाहून त्यांच्या  अनेक सभा व कार्यक्रमांत या टोळीच्या सदस्यांनी हातसफाई केली आहे.  


पोलिस उपायुक्त अतुलकुमार ठाकूर यांनी सांगितले, ही टोळी पुरीच्या जगन्नाथ यात्रेत कामगिरी पार पाडून पुन्हा दिल्लीला येत असल्याची माहिती एटीएसचे प्रमुख विनय यादव यांना खबऱ्याकडून मिळालेली होती. पोलिस पथकाने त्यांची माहिती गोळा केली आणि १८ जुलै रोजी या दोन्ही आरोपींना मौजपूर भागात पकडले. त्यांच्याकडे असलेल्या बॅगेत ४६ स्मार्टफोन, एक देशी पिस्तूल, चार काडतुसे व दुचाकी जप्त केली आहे.


अल्पवयीनांना ट्रेंड करून चोरी करून घेत
ही टोळी गेल्या वीस वर्षांपासून गुन्हेगारी कारवाया करत आहे. काही वर्षांपासून या टोळीतील सदस्य चोऱ्या करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत होते. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांना खिसे कापण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून या टोळीचे संपूर्ण लक्ष राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाकडे होते. यात विविध शहरात होणारे लाइव्ह काॅन्सर्ट, मोठे धार्मिक कार्यक्रम, जगन्नाथ पुरीची रथयात्रा व गणपती विसर्जन कार्यक्रमाचा समावेश आहे.


 चाेरलेल्या ५ हजार फोनची विल्हेवाट
अस्लम याने चौकशीत सांगितले, गेल्या काही वर्षांत आम्ही ५ हजारांहून अधिक मोबाइल फोन चोरले आहेत. ते विकूनही टाकले. त्यांच्याकडे पुरीच्या रथयात्रेत चोरी केलेले ४६ मोबाइल फोन आढळले. ते एका मोबाइल डीलरकडे विकण्यास जात होते. एका कार्यक्रमात टोळीचे सदस्य ४० ते ५० मोबाइल चोरत असत. काही मोबाइल कंपन्यांचे सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांशी त्यांचे संबंध होते.

बातम्या आणखी आहेत...