आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘न्या. लोया प्रकरण; सरकारने दस्तएेवजाचा निर्णय घ्यावा’- सुप्रीम कोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सीबीआय जज बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाशी संबंधित सर्व अहवाल याचिकाकर्त्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले. राज्य सरकारचे वकील हरीश साळवे यांनी न्या. लोया यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट व दस्तऐवज बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवले. 


दस्तऐवज संवेदनशील असल्याने याचिकाकर्त्यांना देता येणार नसल्याचे साळवे म्हणाले. यावर न्या. अरुण मिश्रा आणि न्या. एम.एम. शांतानागौदर यांच्या पीठाने याचिकाकर्त्यांना सर्व माहिती असणे आवश्यक असल्याचे म्हटले. प्रकरणाची सुनावणी पूर्ण पीठाकडे सोपवली जाण्याची शक्यता न्यायालयाने वर्तवली. याचिकाकर्ते व काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांनी वकिलांमार्फत दस्तऐवज देण्याची मागणी केली होती.

 

मृत्यू हृदयविकारानेच

न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे पोस्टमाॅर्टम अहवालातून स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नागपूरचे सह पोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...