आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुगलवरही शोधता येणार नोकरी, नवे फीचर लाँच, 90 हजार कंपन्या यादीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुगलवर नोकरीचा शोध घेणे आता शक्य होणार आहे. मंगळवारी गुगलने भारतात नवीन सेवेला सुरुवात केली. यात युजर आपले क्षेत्र, आवडीचे ठिकाण आणि आपल्या अनुभवाच्या आधारावर नोकरीचा शोध घेऊ शकतो. 'जॉब निअर मी' नावाचे फीचर अँड्रॉइड आणि आयओएसच्या गुगल अॅपवर व डेस्कटॉपवर उपलब्ध असेल. अमेरिकेत एक वर्षापूर्वीच याला लाँच करण्यात आले. भारतात मात्र आता याची सुरुवात झाली. 

 

गुगलच्या या टूलमध्ये विविध प्रकार असतील. गुगलच्या सर्च स्पेसमध्ये 'जॉब निअर मी', 'जॉब फॉर फ्रेशर' असे की-वर्ड टाकताच एक मॉड्यूल उघडेल. यात नोकऱ्यांसंदर्भातील यादी असेल. या यादीतील फिल्टरच्या मदतीने तुम्ही आपल्या योग्यता व गरजेनुसार आवश्यक ती नोकरी शोधू शकता. गुगलने आतापर्यंत जवळपास ९० हजार कंपन्यांना या यादीत जागा दिली आहे. या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांची उपलब्धता होताच याची माहिती गुगल जॉब्जवर अपडेट होईल. युजर आपल्या आवडीनुसार नोकरी शोधून याला सेव्ह किंवा शेअरही करू शकेल. आतापर्यंत नोकरी शोधण्यासाठी इंटरनेटवर जाऊन वेगवेगळ्या वेबसाइटवर त्यांचा शोध घ्यावा लागत होता. नोकऱ्यांची उपलब्धता ऑनलाइन अपडेट झाल्यानंतरही युजर तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हता. ही पद्धत सोपी करण्यासाठी गुगलने ही सेवा लाँच केली आहे. 

 

गुगलचे उपाध्यक्ष राजन आनंदन म्हणाले की, इंटरनेटवर नोकरी शोधणाऱ्यांची संख्या एका वर्षात ४५% ने वाढली आहे. यात ५०% नोकऱ्या मोबाइल फोनवर शोधल्या जात आहेत. २०२० पर्यंत हा आकडा ६३% वर पोहोचेल. यावरून जॉब सर्च टूलची गरज लक्षात येते. 

 

सात फिल्टरचा वापर करून शोधा नोकऱ्या 
- कॅटेगरी नोकरीचे क्षेत्र उदा. इंजिनिअरिंग, एचआर इत्यादी 
- टायटल रिक्त पदे 
- डेट पोस्टेड रिक्त पदे कधी पोस्ट केली 
- टाइप पूर्ण वेळ, अर्ध वेळ, प्रशिक्षणार्थी 
- कंपनी टाइप कंपनीचे नाव 
- एम्प्लॉयर आवडत्या कंपनीची माहिती 
- लोकेशन कार्यालयाचे लोकेशन 

 

जॉब अलर्ट फीचरही 
युजरला जॉब सर्चची यादी सेव्ह करण्यासह जॉब अलर्टचे फीचरही दिले आहे. नोकरीसाठी नावनोंदणी केल्यानंतर तुमच्या आवडीनुसार नोकरी उपलब्ध असल्यास गुगल तुम्हाला ई-मेल पाठवून सूचना देईल. 

बातम्या आणखी आहेत...