आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gopal Shettys Demand For The Consent Of The Girls Marriage At The Age Of 21 Years

वयाच्या 21 वर्षांपर्यंत मुलीच्या लग्नास पालकांची संमती हवीच;गोपाळ शेट्टींची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वयाच्या अठराव्या वर्षी मुलींचा मानसिक, भावनात्मक आणि बौद्धिक विकास तितक्या प्रमाणात होत नसल्याने पालकांच्या संमतीविना लग्न करण्याचे किमान वय १८ वरून २१ वर नेण्यात यावे, अशी मागणी मुंबईतील भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली. यासंदर्भात ते लवकरच लोकसभेत खासगी सदस्य विधेयक सादर करणार आहेत.


खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, तरुणी जर कुटुंबाच्या संमतीने लग्न करत असतील तर १८ व्या वर्षी त्यांचे लग्न करण्यात काही अडथळा नाही. पण कुटुंबीयांच्या इच्छेविरुद्ध लग्न होत असल्यास तरुणीचे वय २१ वर्षे असायला हवे. महाविद्यालयात पाऊल ठेवल्यानंतर तरुणींना फूस लावली जाते. त्यामुळे अजाणतेपणी तरुणी नोंदणी विवाहाचा निर्णय घेतात. परंतु त्यानंतर त्यांना शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागते. 

बातम्या आणखी आहेत...