आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक डाटा लीकची माहिती देण्यास केंद्र सरकारचा नकार; गोपनीयतेच्या अटीवर भारताला दिली माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- यूजर्सचा डाटा लीक झाल्याच्या प्रकरणात फेसबुक आणि ब्रिटिश कन्सल्टन्सी फर्म केम्ब्रिज अॅनालिटिकाने सरकारला माहिती पाठवली आहे. मात्र, ही माहिती सरकार जाहीर करणार नाही. माहिती अधिकारात विचारलेल्या या माहितीवर इलेक्ट्रॉनिक्स व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने हे स्पष्ट केले. दोन्ही कंपन्यांनी गोपनीयतेच्या अटीवर ही माहिती दिली असल्याने ती जाहीर केली जाणार नाही. 


भारतात फेसबुकचे २० कोटी युजर्स आहे. यात ५.६२ लाख युजर्सचा डाटा लीक झाल्याचा संशय असून हा डाटा केम्ब्रिज अॅनालिटिकामार्फत लीक झाला आहे. फेसबुकनुसार, भारतात डाटा लीकमुळे ३३५ लोकांवर थेट परिणाम झाला. उर्वरित ५,६२,१२० लोक या युजर्सच्या फ्रेंड लिस्टमध्ये होते. या लोकांवरही त्याचा परिणाम झालेला असू शकतो. या सोशल मीडिया कंपनीने जगभरातील ८.७ कोटी लोकांचा डाटा लीक झाल्याचे मान्य केले होते. यातील बहुतांश अमेरिकेतील होते. 


देशी सायबर सेक्युरिटी

सायबर सेक्युरिटीसाठी सरकार आता देशात तयार केलेल्या प्रॉडक्टनाच प्राधान्य देईल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत एक आदेश काढला असून केंद्र सरकारची सर्व मंत्रालये आणि विभागांना हा आदेश लागू असेल. 


हाफिजच्या पक्षाचे अकाउंट डिलीट

पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईद याचा राजकीय पक्ष आणि त्याच्या उमेदवारांचे सर्व फेसबुक अकाउंट डिलीट करण्यात आले आहेत. २५ जुलैला पाकमध्ये मतदान होत असून त्यापूर्वी फेसबुकने ही कारवाई केली. हाफिजच्या जमात-उद-दावा संघटनेने इस्लामिस्ट मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल) पक्षाच्या नावे उमेदवार उतरवले आहेत. 


भारतातही सेवा घेतली 
केम्ब्रिज अॅनालिटिकाचा पर्दाफाश करणारा क्रिस्टोफर वायलीने दावा केला आहे की, भारतातही राजकीय पक्षांनी अॅनालिटिकाची सेवा घेतली. यामुळे भारताने याबाबत फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना मार्चमध्ये तर केम्ब्रिज अॅनालिटिकाला एप्रिलमध्ये पत्र पाठवले होते. 

बातम्या आणखी आहेत...