आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता साबण, शाम्पू, टूथपेस्टच्या वेष्टणावरही हिरवे -लाल चिन्ह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या पार्श्वभूमीवर अाता साबण, शाम्पू, टूथपेस्ट, फेसवाॅश, हेअर डाय अादी साैंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंच्या वेष्टणावरही हिरव्या व लाल रंगाचे चिन्ह असेल. हिरवे चिन्ह ती वस्तू शाकाहारी व लाल चिन्ह मांसाहारी असल्याचे दाखवते. शाकाहारी व मांसाहारी वस्तूतील फरक स्पष्टपणे दिसण्यासाठी जैन समाजाने व ग्राहक प्रकरणांच्या मंत्रालयाने याबाबत अनेकदा मागणी केली हाेती.


सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्राेल अाॅर्गनायझेशनच्या (सीडीएससीअाे) अाैषधी-तांत्रिक सल्लागार समितीने बुधवारी याबाबत निर्णय घेतला अाहे. त्यासाठी अागामी सहा महिन्यांत परिपत्रक जारी करण्यात येईल. तसेच या नियमांचे उल्लंघन झाल्यास काॅस्मेटिक कायद्यानुसार शिक्षा व दंड ठाेठावण्यात येईल. याबाबत माहिती देताना ड्रग्ज कंट्राेलर जनरल अाॅफ इंडियाचे डाॅ.एस.ईश्वर रेड्डी यांनी सांगितले की, सीडीएससीअाेकडे साैंदर्य प्रसाधनांच्या अनेक वस्तूंमध्ये जनावरांची चरबी व इतर अंश मिसळले असल्याच्या अनेक तक्रारी अाल्या हाेत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात अाला.

 

खरी-बनावट अाैषधे अाेळखणे हाेईल साेपे
अाता खरी व बनावट अाैषधे अाेळखणे अाणखी साेपे हाेणार अाहे. अाैषधांच्या प्रत्येक पाकिटावर कंपनीचा माेबाइल क्रमांक असेल. तसेच १४ अंकी युनिक क्रमांकही असेल. दिलेल्या माेबाइल क्रमांकावर युनिक क्रमांकाचा एसएमएस पाठवून अाैषधाशी निगडित सर्व माहिती मिळवता येऊ शकेल. प्रथम हा नियम पायलट प्रकल्पाच्या दृष्टीने ३०० महाग व जास्त विकल्या जाणाऱ्या अाैषधांना लागू हाेईल. त्यानंतर परिणामांच्या अाधारे सर्व प्रकारच्या अाैषधांना हा नियम लागू करण्याचा निर्णय सीडीएससीअाेने घेतला अाहे.

बातम्या आणखी आहेत...