आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानांच्या विधवांना मायटी-60 ने दिला ‘सन्मान’; मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लष्करातील निवृत्त कर्नल संजय पांडेय यांनी लष्करातील काही सहकाऱ्यांच्या मदतीने मायटी-६० ही शिक्षण सेवा सुरू केली आहे. ज्या जवानांचा मृत्यू झाला आहे, परंतु ते शहीद म्हणून मानले जात नाहीत अशा जवानांच्या विधवांपर्यंत या सेवेच्या माध्यमातून मदत पोहोचवली जाते. या विधवांची भेट घेऊन त्यांच्या मुलांना अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मदत केली जाते. यासाठी मायटी-६०मधील जे सदस्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत असे लोक जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलतात. मात्र, हे कार्य करत असताना ‘मदत’ हा शब्द मात्र वापरला जात नाही. याला ‘सन्मान’ असे संबोधले जाते. जे सदस्य जवानांच्या विधवांना मदत करण्यास इच्छुक आहेत ते ५ ते १० रुपयांपर्यंतच्या मदतीचा ‘शब्द’ देतात.  याचा अर्थ असा की मुलांच्या शिक्षणासाठी ते हा खर्च करतील. मग जेव्हा शाळा-कॉलेजची फीस भरण्याची वेळ येते तेव्हा हे सदस्य मुलांच्या आईकडे ही रक्कम सुपूर्द करतात. या माध्यमातून या संघटनेतील सदस्य एकत्रितपणे जवानांच्या विधवांना मदत करतात. २०१८साठी अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची प्रक्रिया रविवारपासून सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संघटनेतील सदस्यांनी एक तासाच्या आत १ लाखाहून अधिक रकमेची मदत करण्यासाठी शब्द दिला. या योजनेतून लाभ घेणारा सर्वात लहान मुलगा बालवर्गात तर सर्वात मोठा मुलगा वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. विशेष म्हणजे मुले व कुटुंबाची ओळख गोपनीय ठेवली जाते. 


निवृत्त कर्नल पांडेय सांगतात, २००३मध्ये बटालिकमध्ये डोगरा युनिटची जबाबदारी माझ्याकडे होती. तेव्हा माझ्या लक्षात आले की गॅलेंट्री पुरस्काराने सन्मानित जवानांच्या विधवांना लष्करात वीर नारीचा दर्जा मिळतो, सुविधा व पेन्शही मिळते. मात्र, ज्या जवानांचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतो त्यांच्या विधवा मात्र या सुविधेपासून कायम वंचित राहतात. त्यांना २० हजारपेक्षा कमी पेन्शन मिळते. यात घरखर्चापासून मुलांच्या शिक्षणाचा खर्च व इतर आकस्मिक खर्च भागवावे लागतात. २००३मध्ये मी वैयक्तिक पातळीवर अशा विधवांना मदत सुरू केली होती. २००६मध्ये मी निवृत्ती घेतली, परंतु मदत करणे सुरूच ठेवले. आम्ही या विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी होणारा खर्च करतो. २०१४मध्ये आम्ही ही प्रक्रिया सुनियोजित केली. सदस्यांना एकत्र करून मायटी-६० असे नाव दिले. सदस्याकडून मिळणारा चेक थेट संबंधित कुटुंबातील सदस्यांच्या नावे दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...