आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेमा मालिनी - आधीही बलात्कार होत होते, आता अशा घटनांना अधिक पब्लिसिटी मिळते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी शनिवारी अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासंबंधी वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, 'मुली आणि महिलांवर आधीही बलात्कार होत होते, मात्र सध्या अशा घटनांना जास्त पब्लिसिटी मिळत आहे.' कठुआ-उन्नाव-सूरत येथे मुलींसोबत झालेल्या दुष्कर्मामुळे संपूर्ण देशातून संताप व्यक्त होत आहे. लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन अशा घटनांचा विरोध करत आहेत. दोषींना फाशीची मागणी जोर धरत आहे. शनिवारीच मध्यप्रदेशातील एक प्रकरण समोर आले. या घटनेत अवघ्या 4 महिन्यांच्या बालिकेसोबत तिच्याच नात्यातील व्यक्तीने दुष्कृत्य करुन मुलीची हत्या केली. 

 

देशाचे नाव खराब होत आहे - हेमा 
- हेमा मालिनी म्हणाल्या, लहान मुली आणि महिलांवरील गुन्ह्यांना आता अधिक पब्लिसिटी मिळत आहे. कदाचित आधीही अशा प्रकारचे गुन्हे होत असतील परंतू त्याकडे कोणाचे लक्ष जात नव्हते. या घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले जातील. यामुळे देशाचे नाव खराब होत आहे. 

 

12 वर्षांपर्यंतच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्याला फाशी 
- केंद्रीय कॅबिनेटच्या शनिवारी झालेल्या बैठकीत सरकारने बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पॉक्सो अॅक्ट) यात संशोधन करण्यासाठी अध्यादेशाला मंजूरी दिली आहे. पॉक्सो अॅक्टमध्ये 12 वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलींसोबत होणाऱ्या दुष्कृत्यांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद केली जाणार आहे. 
- सध्या या कायद्यानुसार जास्तीत जास्त जन्मठेप आणि कमीत कमी 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. 

बातम्या आणखी आहेत...