आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'देशात हिंदू तालिबानने बाबरी मशीद पाडली'; सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील धवन यांचा वादग्रस्त युक्तिवाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अयोध्या वादात सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांनी शुक्रवारी वादग्रस्त युक्तिवाद केला. ते म्हणाले, 'ज्याप्रमाणे बामियानमध्ये भगवान बुद्धाची प्रतिमा तालिबानने तोडली होती, त्याचप्रमाणे भारतात बाबरी मशीद हिंदू तालिबानने तोडली होती.' यावर उत्तर प्रदेश सरकारनेही आक्षेप घेतला. 


सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या अध्यक्षतेखालील विशेष पीठासमोर दुपारी २ वाजता सुनावणी सुरू झाली. शिया सेंट्रल वक्फ बोर्डाकडून ज्येष्ठ वकील एस.एन.सिंह म्हणाले, देशाची एकता, अखंडता, शांतता आणि सौहार्दासाठी बोर्ड मुस्लिम समुदायाच्या वाट्याची जमीन राम मंदिरासाठी देऊ इच्छिते.

बातम्या आणखी आहेत...