आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hundreds Of People Cheated By Fake Religious Lady Pushpa Goyal Aka Guru Maa In Delhi

भक्तांच्या भावनांशी गुरु माँने केला खेळ, कोट्यवधींचा गंडा घालून फरार; पती-मुलगीही निघाले बनावट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरु माँ उर्फ पुष्पा गोयल हिने भक्तांना कोट्यवधींचा गंडा घातला. तिचा पतीही बनावट असल्याचे समोर आले. - Divya Marathi
गुरु माँ उर्फ पुष्पा गोयल हिने भक्तांना कोट्यवधींचा गंडा घातला. तिचा पतीही बनावट असल्याचे समोर आले.

नवी दिल्ली - दिल्लीतील दाती महाराजवर त्याच्या शिष्येने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे, या घटनेला काही दिवस होत तोच आणखी एका गुरु माँची बनवेगिरी समोर आली आहे. गुरु माँने भक्तांना कोट्यवधींचा गंडा घातला असून आता ती फरार झाली आहे. 

 

या महिला साधूने फक्त भक्तांच्या भावनांशी खेळ केला नाही तर 200 पेक्षा जास्त भक्तांना कोट्यवधींचा गंडा घालून ती फरार झाली आहे. या बनावट गुरु माँचे खरे नाव पुष्पा गोयल असल्याची माहिती आहे. तिने भक्तांकडून 5 ते 20 लाख रुपयांपर्यंत रक्कम उसणवारीवर घेतली असून आता फरार झाली आहे. एवढेच नाही तर गुरु माँचा पती आणि मुलगीही बनावट निघाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संतोष तोमर या महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. 

 

मंदिरातच दिसत होती गुरु माँ 
- तक्रारदार महिला संतोष तोमरचे म्हणणे आहे, की तीन वर्षांपूर्वी मंदिरात किर्तन करण्यासाठी गुरु माँ उर्फ पुष्पा गोयल आली होती. तेव्हाच आमची भेट झाली आणि तेव्हापासून मी तिची भक्त बनले. 
- पीडितेने सांगितले, की पुष्पा गोयल दयालपूर येथे किरायाच्या घरात राहात होती. मात्र मंदिरात जास्तीत जास्त लोकांशी संपर्क येत असल्यामुळे  तिचा बहूतेक वेळ हा मंदिरातच जात होता. तिचे दोन सेवक होते. 
- गुरु माँची लोकांवर एवढी मोहिनी होती की तिने एखाद्या जागरण, किर्तनासाठी पैसे मागितल्यानंतर लोक लाखो रुपये चंदा देत होते.
- पुष्पा गोयल दरवर्षी विविध धार्मिक स्थळांची यात्रा काढत होती, त्यामध्ये अनेक लोक सहभागी होत होते. तिच्या धार्मिक वृत्तीमुळे लोकांची तिच्यावरील श्रद्धा वाढत चालली होती. त्याचाच तिने फायदा घेतला आणि जवळपासे् 200 जणांना लाखो रुपयांचा गंडा घातला. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे.

बातम्या आणखी आहेत...