आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआय, पीएनबीसह आयसीआयसीआयचे कर्ज 0.25% पर्यंत महाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- एसबीआय, आयसीआयसीआय आणि पीएनबीने कर्ज महाग केले आहे. एसबीआयने एक वर्षाच्या मुदतीसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) ०.२०% अाणखी ३ वर्षांसाठी ०.२५% वाढवला. यामुळे २० लाखांच्या गृहकर्जाचा हप्ता २५३ रुपयांनी वाढेल. नवीन दर १ मार्चपासून लागू झाले आहेत. म्हणजेच या तारखेपासून कर्ज घेणाऱ्यांना जास्त व्याज लागेल. बेस रेटच्या जुन्या पद्धतीनुसार कर्ज घेणाऱ्यांवर याचा बोजा पडणार नाही. आयसीआयसीआयने १ वर्षाच्या कर्जाचा व्याजदर ०.१०% वाढवत ८.६५% वरून ८.७५% केला. पीएनबीने व्याज ०.१५% वाढवत  ८.५५% वरून ८.७०% केले. बहुतांशी कर्जे एका वर्षाच्या एमसीएलआरवर घेतली जातात. यामुळे १ मार्चपासून ज्यांच्या कर्जाचे एक वर्ष पूर्ण होईल, त्यांनाही जास्त व्याज भरावे लागेल.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, ५० लाख कर्ज; हप्ता ६३१ रु. वाढणार...

बातम्या आणखी आहेत...