आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मार्च तिमाहीत आयडिया सेल्युलरच्या तोट्यात 183% वाढ, 930.6 कोटींवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दूरसंचार सेवांच्या दरयुद्धामुळे रिलायन्स जिओ सोडल्यास इतर सर्व दूरसंचार कंपन्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या चौथ्या तिमाहीमध्ये आयडिया सेल्युलरच्या तोट्यात तिप्पट वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च तिमाहीमध्ये कंपनीचा तोटा ९३०.६ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी समान तिमाहीमध्ये कंपनीला ३२५.६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, तर दुसरीकडे मार्च तिमाहीमध्ये कंपनीच्या नफ्यात २४.४७ टक्के घट झाली आहे. त्यानुसार कंपनीचा नफा ६,१३७.३ कोटी रुपयांवर 
आला आहे. 


सप्टेंबर २०१६ मध्ये रिलायन्स जिओ बाजारात आल्यानंतर दूरसंचार क्षेत्रामधील कंपन्यांमध्ये दर कपात करण्याची स्पर्धा रंगली आहे. त्याचा सरळ-सरळ नकारात्मक परिणाम सर्व दूरसंचार कंपन्यांवर झाला आहे. जानेवारी ते मार्च २०१८ तिमाहीमध्ये रिलायन्स जिओचा नफा १.२ टक्क्यांनी वाढून ५१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर भारती एअरटेलचा नफा ७८ टक्क्यांच्या घसरणीसह केवळ ८३ कोटी रुपये राहिला. या आधीच्या वर्षात समान तिमाहीमध्ये कंपनीला ३७३ कोटी रुपयांचा नफा झाला हाेता.


विलीनीकरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात : आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियामध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

तोट्यात १० पट वाढ 
पूर्ण आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये आयडिया सेल्युलरला ४,१३९.९ कोटींचे नुकसान झाले. गेल्या आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये झालेल्या ४०४ कोटी रुपयांच्या नुकसानीच्या तुलनेत हे १० पट जास्त आहे. उत्पन्न २२.९ % कमी होऊन २८,२७८.९ कोटी रुपये राहिले. गेल्या आर्थिक वर्षात ३६,६७६.८ कोटींचे उत्पन्न झाले होते. 

 

प्रतिस्पर्धा जबाबदार
१.  दरात कपात करण्यासंदर्भात कंपन्यांदरम्यान एकमेकांचा गळा कापण्याची प्रतिस्पर्धा.
२. देशांतर्गत कॉल टर्मिनेशन शुल्क (सीटीसी) १४ वरून कमी होऊन ६ पैसे प्रतिमिनिट झाले
३. आंतरराष्ट्रीय सीटीसी ५३ वरून कमी होऊन ३० पैसे प्रतिमिनिट झाले
४. दूरसंचार नियामकाने नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली.
५. जुन्या दूरसंचार कंपन्यांवर कर्जाचे ओझे जास्त होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...