आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If The Builder Does Not Give The Flat; Money Should Be Returned With The Compensation

बिल्डरने मुदतीत फ्लॅट न दिल्यास भरपाईसह पैसे परत करावेत; ग्राहक आयोगाचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्लॅट बुक करणाऱ्या ग्राहकांना पझेशनसाठी अनिश्चित काळापर्यंत वाट पाहण्यास सांगितले जाऊ शकत नाही. ते आपले पैसे भरपाईसह परत मागू शकतात. दिल्लीची कंपनी अडेल लँडमार्क्सशी संबंधित एका प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (एनसीडीआरसी) हा निकाल सुनावला. पाच ग्राहकांना ६६ लाख रुपये परत करण्याचे आदेशही कंपनीला देण्यात आले आहेत. 


अडेलने २०१२ मध्ये गुरगावमधील प्रकल्पात फ्लॅटची विक्री केली होती. मात्र ५ वर्षे उलटूनही पझेशन दिले नाही. न्यायमूर्ती व्ही. के. जैन यांच्या न्यायपीठाने  सांगितले की, पझेशन देण्यात उशीर का झाला आणि कधीपर्यंत ते देण्यात येईल, याचे उत्तर कंपनीने दिले नाही. यामुळे मूळ रकमेसह सव्याज भरपाई मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. आयोगाने कंपनीला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही रक्कम पाचही ग्राहकांना विभागून मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...