आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदारांनी 3 लाख ट्विटर फॉलोअर्स जोडल्यास त्यांच्याशी थेट चर्चा : मोदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नमो अॅपवर भाजप खासदार, आमदारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जर खासदारांनी आपल्या भागातील ३ लाख लोकांना आणि आमदारांनी १-२ लाख लोकांना ट्विटरवर आफले फॉलोअर केले तर मी त्यांच्याशी या तंत्रज्ञानाद्वारे चर्चा करण्यास तयार आहे. मला थेट संवाद साधण्यास आनंद वाटेल.

 

खासदार, आमदारांना सल्ला देताना मोदी म्हणाले की, त्यांनी मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांना औषधी आणि युवकांच्या कमाईवर लक्ष केंद्रित करा. एका खासदाराशी चर्चा करताना ते म्हणाले की, आधी हृदय विकाराच्या उपचारासाठी एक ते दीड लाख रुपये लागत होते, आता ही रक्कम खूप कमी झाली आहे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ गरीब आणि मध्यम वर्गालाच मिळावा यासाठी चुकीचे नाव पात्रता यादीत येऊ नये याची काळजी खासदार-आमदारांनी आपापल्या भागात घ्यावी.

 

भाजप कार्यकर्त्यांनी सांभाळून बोलावे, प्रसार माध्यमांना दोष देऊ नये
मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना सल्लाही दिला. ते म्हणाले की, प्रत्येक मुद्द्यावर देशाचे प्रतिनिधी होण्याचा प्रयत्न करू नका, माध्यमांना दोष देऊ नका. काही वर्षांत भाजप कार्यकर्ते खूप परिपक्व झाले आहेत, पण काही गोष्टी कटू वाटत असल्या तरी त्या बोलणे गरजेचे आहे. आपण लोक कॅमेरा पाहताच चुका करतो.

 

गावाच्या विकासासाठी राळेगण सिद्धीचा आदर्श घ्या
मोदी म्हणाले की, मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांची औषधे आणि युवकांच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करा. गावाच्या विकासासाठी सर्वांनी अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धी या गावाचा आदर्श ठेवावा.

 

मोदींना विचारलेले ४ प्रश्न

 

 

मोदींना देशातील वेगवेगळ्या भागातील अनेक खासदार-आमदारांनी प्रश्न विचारले. मोदींनी त्यांना उत्तर आणि सल्ला दिला.


1. यूपीचे आमदार सुरेश राहींनी विचारले, गावात योजनांचा प्रचार कसा करावा?
आमदार आणि खासदारांनी गावात विकासाच्या कामांच्या खर्चाची यादी जाहीर करावी. नियमित ग्रामसभा घेऊन लोकांना जागरूक करावे. शेतकऱ्यांसाठी सौर पंप लावा. त्यांना युरिया द्या.


2. भोपाळचे खासदार आलोक संजर यांनी विचारले की, कौशल्य विकासचा युवकांना फायदा काय?
काळासोबत सगळे बदलते. मी सीएम होतो. एका गावात गेलो होतो तेव्हा ८०० लोकसंख्येच्या गावात दोन मुली ब्युटीपार्लर चालवत होत्या. गावातही कौशल्य असते. मुद्रा योजनेतून युवकांना रोजगार मिळत आहे.


3. आसामचे आमदार नुमल मोमीन यांनी विचारले, मोदी केअरबाबत लोकांना माहिती कशी द्यावी?
सर्वात आधी आयुष्मान भारतबाबत लोकांना सांगा. त्यांना त्याचा फायदा द्या. ८ ते १० गावांत एक वेलनेस सेंटर स्थापन करा. तेथे चांगल्या डॉक्टरने भेट द्यावी. राजकारणासाठी अनवाश्यक लोकांना जोडू नका. त्यामुळे गरिबांचे अहित होते.


4. अहमदाबादचे खासदार कीर्ती सोळंकी यांनी विचारले की, ग्राम शक्ती पुढे कशी वाढवावी?
गावांत लोक श्रीमत-गरीब व धर्माच्या आधारावर विभागले जाऊ नयेत. सर्वांना जबाबदारी समजून घ्यावी लागेल. मुलांना शाळेत जाण्यासाठी प्रेरित करावे.

 

प्रत्येक जिल्ह्यात १ लाख नमो अॅप यूजर करण्याचे उद्दिष्ट:

मोदींनी ऑक्टोबर २०१४ मध्ये नमो अॅप लाँच केले होते. ते आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे.  अमित शहा यांनी प्रत्येक जिल्ह्यात नमो अॅपचे एक लाख यूजर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०१९ च्या निवडणुकीत १८ कोटी नवे मतदार पहिल्यांदाच मतदान करतील, त्यामुळे राजकीय पक्ष सोशल मीडियाला प्रचार माध्यम बनवत आहेत. भारतात २४.१ कोटी फेसबुक यूजर आहेत. त्यात ५.४ कोटींचे वय १८ ते २३ वर्षांदरम्यान आहे.


भारतीय नेत्यांमध्ये सर्वात जास्त ४२.१ कोटी ट्विटर फॉलोअर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...