आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने आंबेडकरांचे नाव इतिहासातून मिटवण्याचा प्रयत्न केला, त्यांना नेहरूंच्या कॅबिनेटमधून राजीनामा द्यावा लागला- मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली येथील अलीपूर रोडवरील डॉ. भीमराव आंबेडकर मेमोरियलचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, 1972 मध्ये आंबेडकर मेमोरियलचा विचार समोर आला होता, परंतु त्यावेळच्या सरकारने या प्रकल्पाच्या फायली बंद केल्या. आधीचे सरकार कामे पूर्ण कारण्याच्या तारखा पूढे ढलकत होते. परंतु, आमचे सरकार काम पूर्ण करण्यासाठी तारीख ठरवते. अशीच आम्ही मेमोरीयलच्या कामाला सुरूवात केली आणि आता त्याचे उद्घाटन होत आहे.तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे मेट्रो ट्रेनने पोहोचले. लोककल्यान मार्ग मेट्रो स्टेशन ते उलीपूर रोड मेट्रो स्टेशनपर्यंत मोदींनी मेट्रोने प्रवास केला.

 

 

ज्या सेंट्रल हॉलमध्ये महापुरूषाने संविधान लिहिले, त्या ठिकाणी फोटो लावण्यास काँग्रेस सरकार असताना जागा नव्हती -मोदी
-मोदी म्हणाले की, ज्या महापूरूषाने सेंट्रल हॉलमध्ये संविधान लिहिले, कांग्रेस सरकारमध्ये त्या महापूरूषाचा फोटो लावण्यास जागा नव्हती. भाजप सरकर आल्यानंतर बाबासाहेबांचा फोटो सेंट्रल हॉलमध्ये लागला.
- बाबासाहेबांना भारत रत्न तेव्हा मिळाले, जेव्हा भाजपच्या समर्थनात वापी सिंह यांचे सरकार सत्तेत आले होते.
- मी आज काँग्रेसला आव्हान देतो की, त्यांनी असे एक काम सांगावे जे त्यांनी बाबासाहेबांच्या सम्मानासाठी केले होते.
- स्वत: नेहरू बाबासाहेबांना लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी प्रचार करण्यासाठी पोहचले होते. बाबासाहेबांना कायदेमंत्री बनवल्याचा भ्रम काँग्रेसकडून पसरवण्यात येत आहे. बाबासाहेब देशाच्या संविधानाचे निर्माते होते. त्यांनी काँग्रेसपुढे गुढगे टेकले नाही. ज्यांनी असे केले, त्यांना पुस्तकात देखील जागा मिळाली नाही.
- आज 70 वर्षाची काँग्रेस संसदेत ओबीसी कमिशनला संविधानीक दर्जा देण्याच्या कामाला थांबवण्याचे काम करत आहे.

- बाबासाहेबांनी लिहिले होते- मला कॅबिनेटच्या कोणत्याच कमिटीमध्ये घेतले नाही. विदेशी प्रकरणांच्या कमिटीत देखील सहभागी केले नाही. आर्थिक प्रकरणांच्या कमिटीत मला घेतील असे वाटले होते, परंतु तेथे देखील मला घेण्यात आले नाही.
- लोकांना माहिती होणे गरजेचे आहे की, बाबासाहेबांनी काँग्रेसचे चरित्र उघडे करून ठेवले होते. काँग्रेस आणि बाबासाहेब यांच्यातील संबंध तुटण्याच्या शेवटच्या काळातील अनेक बाबी बाबासाहेबांनी लिहून ठेवल्या आहेत.
- काँग्रेसने बाबासाहेबांचे नाव देशाच्या इतिहासातून मिटवण्यासाठी संपूर्ण ताकत लावली होती. जेव्हा बाबासाहेब जिवंत होते, तेव्हा देखील त्यांचा अपमान करण्याची कोणतीच कसर काँग्रेसने सोडली नाही.

 

असे आहे म्यूझियम...
या म्यूझियममध्ये बाबासाहेब आंबेडकर यांना 3डीमध्ये तीन जागी लाइव्ह ऐकता येणार आहे. यात डॉ. आंबेडकर यांच्या आवाजाची मिक्सिंग करण्यात आली आहे. याशिवाय, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये क्लासला येताना-जातानाचे बाबासाहेबांचे लाइव्ह 3डी मूव्हमेंट देखील अनुभवता येणार आहेत.म्यूझियममध्ये दीड डझन स्क्रीनवर एकसोबत 15-20 लोक संपूर्ण संविधान वाचू शकतात. टच बटन दाबताच या पुस्तकाचे पान पलटतात. बौद्ध शैलीने बनलेल्या म्यूझियममध्ये मेडिटेशन सेंटर देखील बनवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...