आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सला मागे टाकून भारत बनला जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्रान्सला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्थेने जगात सहावे स्थान पटकावले. जागतिक बँकेने २०१७ मध्ये केलेल्या विश्लेषणात याची माहिती देण्यात आली. मागील वर्षाच्या अखेरीस भारताचा जीडीपी १७८.६० लाख कोटी (२.५९ लाख कोटी डॉलर) आणि फ्रान्सचा जीडीपी १.७७.५६ लाख कोटी होता. 


जागतिक बँकेनुसार, नोटबंदी आणि जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था मंदावली होती. परंतु मागील वर्षी उत्पादन आणि मागणी वाढल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे. मागील एका दशकात भारताचा जीडीपी दुप्पट झाला आहे. चीनच्या विकासाची गती कमी झाल्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत आशियात भारत आर्थिकदृष्ट्या बळकट होण्याची शक्यता आहे. २०३२ पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज लंडनमधील सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने व्यक्त केला.


जगातील सर्वात मोठ्या ५ अर्थव्यवस्था 
देश - जीडीपी 
अमेरिका - १,३३३ 
चीन - ८४१ 
जपान - ३३५ 
जर्मनी - २५२ 
ब्रिटन - १८० 
(जीडीपी लाख कोटी रुपयांत) 

बातम्या आणखी आहेत...