आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे देशातील फर्स्ट लेडी ग्रॅफिटी आर्टिस्ट, हिप-हॉप डान्स शिकताना लागला छंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काजल सिंह देशातील पहिली ग्रॅफिटी आर्टिस्ट आहे. - Divya Marathi
काजल सिंह देशातील पहिली ग्रॅफिटी आर्टिस्ट आहे.

नवी दिल्ली - रस्त्याने चालत असताना तुम्हाला वेगवेगळ्या रंगात रंगवलेली, पेंटिंग केलेली भिंत दिसली तर ते चित्र डोळ्यांना नक्कीच सुखद दिसते. देशाच्या राजधानीत सध्या अशा अनेक भिंती तुम्हाला दिसतील ज्यावर पेंटिंग्ज केलेले आहे. याला ग्रॅफिटी आर्ट म्हटले जाते. काही कलाकारांनी या कलेत प्राविण्य मिळवले आहे. कला क्षेत्रातील विविध प्रकारांपैकी ग्रॅफिटी आर्ट हे सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. दिल्लीतील नांगलराया येथील रहिवासी काजल सिंह भारतातील पहिली ग्रॅफिटी आर्टिस्ट आहे. काजल बर्लिनमध्ये राहाते, सध्या ती दिल्लीला आलेली आहे. काजल सिंहसोबत दिल्ली भास्करने खास बातचित केली आणि तिच्या कलेविषयी जाणून घेण्यात आले. 

 

पेंटिग्जमध्ये ग्रॅफिटी आर्टचीच निवड का? 
- सर्वप्रथम मी हिप-हॉप डान्सर आहे. त्या काळात मी हिप-हॉप चे चार प्रकार, ब्रेक-डान्स, ग्रॅफिटी, डीजे, रॅपिंग याबद्दल वाचत होते. या एक-एक प्रकाराबद्दल वाचत असताना मला वाटले की ग्रॅफिटी आर्ट ट्राय केले पाहिजे. त्याच्या शोधात इंटरनेटवर जगभरातील आर्टिस्ट शोधले त्यांच्या कलाकृती पाहिल्या, त्यांचा अभ्यास केला. त्या कॉपी करण्याचा प्रयत्न केला. माझी ही कला मी सोशल मीडियावरुन लोकांपर्यंत नेऊ लागले. 2012 मध्ये इंडो-जर्मन प्रोजेक्टसाठी मला ऑफर आली. आमच्या दोघा बहीण-भावाची त्यासाठी निवड झाली. तेव्हापासून या फिल्डमध्ये आहे. 

 

नुकतेच राष्ट्रपतींनी तुला पहिली महिला ग्रॅफिटी आर्टिस्ट आवॉर्ड दिला. त्याबद्दल काय सांगशील?
- जगातील अनेक देशामध्ये माझी कला पोहोचली आहे. त्यांच्याकडून सन्मानही मिळाले आहेत. जर्मनीमध्ये 2015 मध्ये अवॉर्ड मिळाला होता. 2017 मध्ये अमेरिकेतील ट्रिनिटी कॉलेजमध्ये मला सन्मानित करण्यात आले होते. मात्र स्वतःच्या देशाने दिलेला सन्मान हा सर्वोच्च आहे. या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने आणखी उपाय योजना करण्याची गरज आहे. देशात या कले बद्दल अजून हवी तेवढी जागरुकता नाही. वास्तविक या कलेला मोठा इतिहास आहे.

 

ही कला शिकताना अभ्यासताना काही त्रास झाला? 
- झाला देखील आणि नाही पण, असेही म्हणता येईल. लहानपणापासून मला आर्ट कळत आले आहेत. रंगांचा वापर कसा करायचा हे माहित होते. फक्त कलर कॅनने पेंटिंगचा अनुभव नवा होता. यामध्ये आई-वडिलांनी पूर्ण साथ दिली. 

 

शिक्षण पूर्ण झाले नाही आणि कामाला सुरुवात झाली आता पुढे काय ? 
- माझे ग्रॅज्यूएशन झाले आहे. लेडी इर्विन कॉलेजमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे. बर्लिनच्या एका आर्ट कंपनीसोबत सध्या काम सुरु आहे, तेव्हा पुढील शिक्षण आता आर्टमध्येच होईल. 

 

काय आहे ग्रॅफिटी आर्ट?
- विदेशात जेव्हा स्ट्रिट डान्सची चलती होती तेव्हा हिप-हॉप सर्वात प्रसिद्ध प्रकार होता. त्याचे एलिमेंट्स ब्रेक-डान्स, ग्रॅफिटी, डीजे, रॅपिंग हे होते. लोक रस्त्यावर नाचत पेंटिंग्ज करत आणि स्ट्रिट वॉल रंगून टाकत होते. 

 

आर्टिस्ट नाव बदलून करतात काम 
- ग्रॅफिटी आर्ट करणारे सर्व कलाकार हे स्वतःचे नाव बदलून काम करतात. त्यामुळे काजलने तिचे नाव आता डीजी-वन आणि तिचा भाऊ आकाशला कॉमेट नावाने ओळख मिळाली आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, काजलची ग्रॅफिटी... 

बातम्या आणखी आहेत...