आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्‍प यांच्‍या ट्रेड वॉरला भारताचे प्रत्‍युत्‍तर, 29 अमेरिकी उत्‍पादनांवरील आयात शुल्‍क वाढवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्टील आणि अॅल्युमिनियमवर अमेरिकेने लावलेल्या आयात शुल्काच्या विरोधात कारवाई करत भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या २९ वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली आहे. यात सफरचंद, डाळी, अक्रोड, बदाम, हरभऱ्यासह अनेक कृषी उत्पादनाचा समावेश आहे. काही लोखंडी तसेच स्टील उत्पादनावरही आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. हरभऱ्यावरील आयात शुल्क ३०% वरून वाढून ७०%, अक्रोडवरील ३०% वरून १२०% सफरचंदावरील ५०% वरून ७५%, स्टीलच्या रोल्ड उत्पादनावर १५% वरून वाढवून २२.५% करण्यात आले आहे.  

 

वाढीव आयात शुल्क चार आॅगस्टपासून लागू होईल. या वस्तूंची दरवर्षी सुमारे २४ कोटी डॉलरची (१,६०० कोटी रुपये) आयात होते. आयात शुल्कात भारताने केलेल्या या वाढीमुळे देशात तयार उत्पादने अपेक्षेप्रमाणे स्वस्त मिळतील. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी वाढेल, असे मत डेलॉय इंडियाचे पार्टनर एम. एस. मणी यांनी व्यक्त केले आहे.   

 

अमेरिकेने काही दिवसांपूर्वी स्टीलवर २५ टक्के, तर अॅल्युमिनियमवर १० टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती. भारताने ट्रम्प प्रशासनाला स्टील-अॅल्युमिनियम आयात शुल्कात सवलत देण्याची मागणी केली होती. मात्र, अमेरिकेने भारताची मागणी रद्द केली होती. भारताने अमेरिकेच्या या निर्णयाला डब्ल्यूटीओ मध्ये आव्हान दिलेले आहे.   

 
भारताने मागील आठवड्यातच जागतिक व्यापारी संघटनेला (डब्ल्यूटीओ) या वस्तूंची दुरुस्तीसह यादी दिली होती. अर्थ मंत्रालयाच्या नोटिफिकेशनमध्ये ८०० सीसीपेक्षा जास्त इंधन क्षमता असलेल्या माेटारसायकलचा समावेश नाही. अमेरिकेच्या हार्ले-डेव्हिडसनची बाइक याच श्रेणींमध्ये येते. वास्तविक डब्ल्यूटीओला देण्यात आलेल्या यादीत या बाइकचे नाव नव्हते.  


आॅगस्टपासून शुल्क  
भारत अमेरिकेच्या या वस्तूंवर तत्काळ शुल्कवाढ करू शकत होता. मात्र, अमेरिकेचे सहायक व्यापार प्रतिनिधी मार्क लिस्कॉट पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासोबत दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा होणार आहे. त्यामुळे सरकारने आॅगस्टपासून शुल्क लावण्याचा पर्याय निवडला.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, युरोपही लावणार अमेरिकी उत्पादनांवर २५ टक्के शुल्क...

 

बातम्या आणखी आहेत...