आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशांत क्षेत्र खुले करण्यासाठी व्हिएतनाम सहकार्य करणार, भारतासोबत 3 करार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारत-व्हिएतनाममध्ये व्यापार, अाण्विकसह तीन क्षेत्रात सामंजस्य करार झाले आहेत. उभय देशांतील व्यापार वाढवण्यावर सहमती झाली आहे.  संरक्षण क्षेत्र द्विपक्षीय संबंधातील महत्त्वाचा स्तंभ म्हणून उदयाला आला आहे. 

 

व्हिएतनाम व भारत मिळून खुल्या, स्वतंत्र व प्रगतीशील भारत-प्रशांत सागरी क्षेत्रासाठी काम करणार आहोत. हे क्षेत्र खुले करण्यासाठी व्हिएतनाम मदत करणार आहे. त्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचा सन्मान केला जाईल. मतभेद चर्चेतून सोडवले जातील. सागरी सहकार्यावर भर दिला जाईल, असे  याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करून या दौऱ्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष त्रान दाइ क्वांग यांचे स्वागत केले. क्वांग पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांचे नाते आहे.  तत्पूर्वी क्वांग यांचे राष्ट्रपती भवनात आैपचारिक स्वागत झाले. याप्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती होती.

 

परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही क्वांग यांची भेट घेतली.  आसियानशिवाय भारत, व्हिएतनाम, पूर्व आशिया संमेलन, मेकोंग गंगा सहकार्य, आशिया युरोप बैठक इत्यादी क्षेत्रीय व्यासपीठावरही उभय देश परस्परांना सहकार्य करत आहेत. दरम्यान, क्वांग शुक्रवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर ते पवित्र बौद्ध तीर्थक्षेत्र बोधगयेच्या दौऱ्यावर गेले होते. भारत-व्हिएतनाम यांच्यातील भारत-प्रशांत सागरी क्षेत्रासंबंधीचा करार महत्त्वाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...