आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CWC मधून दिग्विजय सिंह OUT; म्हणाले..काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आव्हानात्मक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राहुल गांधी यांनी पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. नव्या कार्यकारिणीमध्ये युवा वर्गाचाही समावेश करण्यात आला असून दिग्विजय सिंह यांच्यासह सुशील कुमार शिंदे, बीके हरिप्रसाद, सीपी जोशी, हेमो पूर्वा सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, सुशीला तिरिया, आशा कुमारी, ए चेला कुमार, कर्ण सिंह, ऑस्कर फर्नांडीज आणि के एच मुनियप्पा या ज्येष्ठ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

 

काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आव्हानात्मक- दिग्विजय सिंह

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून आऊट झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी एक नवी टीम बनविल्याचा आनंद आहे. मात्र, आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी आव्हानात्मक असेल. राहुल यांनी नव्या कार्यकारिणीत कोण-कोणाचा समावेश केला आहे, यावर चर्चा करण्‍याची ही योग्य वेळ नसल्याचेही सिंह यावेळी म्हणाले. पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात सहभागी होण्यासाठी दिग्विजय सिंह राज्यसभेत पोहोचले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

नव्या कार्यकारिणीमध्ये 23 सदस्य, 19 निमंत्रित स्थायी सदस्य आणि 9 निमंत्रित सदस्य असणार आहेत, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी सांगितले. त्यामुळे राहुल गांधींच्या नव्या टीममध्ये 51 सदस्य असतील.

 

अशी आहे काँग्रेसची नवी कार्यकारिणी...
नव्या कार्यकारिणीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, पक्षाचे खजिनदार मोतीलाल वोरा, अशोक गहलोत, गुलाब नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, एके एंटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी आणि ओमन चांडी यांना स्थान देण्यात आले आहे. यांसह आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत, ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, कुमारी शैलजा, मुकूल वासनिक, अविनाश पांडे, केसी वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीणा आणि गैखनगम यांचाही काँग्रेस कार्यकारिणीत समावेश झाला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...