आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- निवडणूक आयोगाने ईशान्येतील तीन राज्ये त्रिपुरा, मेघालय व नागालँड विधानसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या राज्यांत गुरुवारपासून आचारसंहिता लागू झाली. मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी गुरुवारी निवडणुकीची माहिती दिली. त्रिपुरात पहिल्या टप्प्याचे मतदान १८ फेब्रुवारीला होईल. दुसऱ्या टप्प्याचे मतदान २७ फेब्रुवारीला नागालँड व मेघालयात होईल. निकाल ३ मार्च रोजी आहे. या तीन राज्यांमध्ये २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा केवळ एक आमदार होता. सध्या त्यांचे १४ आमदार आहेत. हे सर्व आमदार अन्य पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. त्रिपुरा व मेघालयमध्ये एकही भाजप आमदार नाही. नागालँडमध्ये केवळ एक आमदार होता. एवढेच नव्हे तर भाजपच्या घटकपक्षांमध्येही अन्य पक्षांतून १५ आमदार आले आहेत. २०१४ नंतर भाजपने ईशान्येतील सातपैकी ४ राज्यांत सरकार स्थापन केले. यामध्ये आसाम, मणिपूर, अरुणाचल, नागालँड यांचा समावेश आहे. भाजपचे लक्ष आता त्रिपुरा, मेघालय व नागालँडवर आहे.
मेघालय: काँग्रेसला भाजप-एनपीपी आघाडीचे आव्हान
काँग्रेसने मेघालयातील सरकार वाचण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. मात्र, भाजपनेही काँग्रेसचे आमदार फोडले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांचे ४ आमदार भाजपमध्ये दाखल झाले. यात एक काँग्रेसचा होता. या महिन्यात ८ आमदार भाजपचा मित्रपक्ष एनपीपीमध्ये सहभागी झाले. यामध्ये ५ काँग्रेसचे आहेत. एनपीपीचे नेतृत्व पी. ए. संगमा यांचे पुत्र कॉनराड संगमा करत आहेत. एनपीपी, भाजपच्या नेतृत्वातील नॉर्थईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्समध्ये २०१६ मध्ये सहभागी झाली.
नागालँड : भाजपचा मुख्य उद्देश जागा वाढवणे व सरकार वाचवणे
येथे भाजप व नागा पीपल्स फ्रंटचे (एनपीएफ) आघाडी सरकार आहे. २०१३ निवडणुकीत भाजपला केवळ १ जागा मिळाली होती. सध्या ४ आमदार आहेत. राज्यात भाजपसमोर एनडीएची सत्ता कायम राखणे व आपल्या जागा वाढवण्याचे आव्हान आहे. केंद्रीय राज्यमंत्री किरेन रिजिजू निवडणूक प्रभारी आहेत. २०१५ मध्ये काँग्रेसचे सर्व आठ आमदार एनपीएफ-भाजप आघाडीत दाखल झाले होते.
त्रिपुरा: २५ वर्षांपासून डावे सरकार, पहिल्यांदाच भाजपशी थेट लढत
राज्यात २५ वर्षांपासून डावे सरकार आहे. येथे आधी डावे-काँग्रेसमध्ये थेट लढत असायची. मात्र, या वेळी डाव्यांना भाजपचे आव्हान आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेसचे ६ आमदार भाजपमध्ये आले होते. पंतप्रधान मोदींच्या ३१ जानेवारीला दोन सभा होतील. राज्यात सुमारे ३५% बंगाली नाथ पंथ आहे. योगींनी स्वीकारलेला हाच पंथ होता.
मोदींनी ईशान्य राज्यांना ७९ हजार कोटी रुपयांची भेट दिली
गेल्या वर्षी मोदींनी दोन वेळा मेघालयचा दौरा केला. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी ते मेघालय व मिझोरामला गेले होते. त्यांनी ईशान्य राज्यात ४००० किमीचा महामार्ग बांधण्यासाठी ३२०० कोटी रु. आणि १५ नवीन रेल्वेमार्ग टाकण्यासाठी ४७००० कोटी रुपये देऊ केले. त्यांनी मिझोराममध्ये जलविद्युत ऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा... त्रिपुरात १८ फेब्रुवारी व मेघालय व नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.