आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंटनखाण्‍यात पत्नीला विकण्यासाठी पोहोचला पती, योग्य किंमत न मिळाल्याने रचला हत्येचा कट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पत्नी वारंवार भांडण करत असल्याने त्रस्त झालेल्या पतीने चक्क तिला कुंटनखाण्यावर विकण्याचा प्रयत्न केला. मात्र, योग्य किंमत न मिळाल्याने त्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला. परंतु ऐनवेळी पोलिसांनी त्याला अटक केल्याने मोठा अनर्थ टळला. सद्दाम हुसैन (वय-29) असे आरोपीची नाव आहे.

 

पत्नीला विकत होता दीड लाख रुपयांत
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जीबी रोडवर एक व्यक्ती एका महिलेला विकण्यासाठी आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस इन्स्पेक्टरने आरोपीला फोन करून महिलेबाबत विचारणा केली. आरोपीने इन्स्पेक्टरला पोलिस समजून पत्नीची किंमत दीड लाख रुपये सांगितली. इन्स्पेक्टरने पोलिस शिपाईला साध्या गणवेशात सद्दामकडे डील करण्‍यासाठी पाठवले. शिपाईने एक लाख 20 हजार रुपयांत डील केली. अॅडव्हास म्हणून 10 हजार रुपयेही दिले. आरोपीला महिलेसोबत नवी दिल्ली रेल्वे स्टेशन परिसरातील शिवाजी पार्कजवळ बोलावले. आरोपी पत्नीला घेऊन आला असता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

 

सद्दामकडे आढळला चाकू
सद्दाम याने पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचेही पोलिस चौकशीत समोर आले. त्याच्याकडून पोलिसांनी चाकू जप्त केला आहे. त्याने टीशर्टवर शर्ट परिधान केला होता. त्यात चाकू लपविला होता.

 

सद्दामला दोन पत्नी...
सद्दामला दोन पत्नी आहेत. त्याने ते पोलिस चौकशीत कबूल केले आहे. दोघींचे कायम भांडण होत होते. या भांडणाला तो वैतागला होता. त्यामुळे एका पत्नीची हत्या करण्याचा कट त्याने आखला होता. तो पानीपत येथून पत्नीला विकण्यासाठी जीबी रोड येथे आला होता. पत्नीची योग्य किंमत मिळाली नाही तर तिची हत्या करण्‍याचा त्याचा इरादा होता.

 

बातम्या आणखी आहेत...