आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे आपले सोशल व्हिडिओ अॅप first wall लाँच; तुम्हीही बनू शकता Digital सेलिब्रिटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताचे आपले सोशल व्हिडिओ अॅप Firstwall लाँच झाले आहे. या व्यासपीठावर तुम्हाला बातम्याच नव्हे तर क्रीडा, गॉसिप, व्हायरल व ट्रेंडिंग व्हिडिओसह लाखो व्हिडिओ पाहता येतील. इतकेच नव्हे तर तुम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोडही करता येतील. विशेष म्हणजे हा प्लॅटफॉर्म हिंदीसाठी तयार करण्यात आला आहे. त्यावरील सर्व व्हिडिओ हिंदीतच मिळतील. फर्स्टवॉल अॅपवर 3 हजारहून जास्त प्रोफेशनल व्हिडिओ तयार करणारे दररोज 100 तासांपेक्षा जास्त अवधीचे व्हिडिओ अपलोड करत आहेत.

 

तुम्हीही बनू शकता डिजिटल सेलिब्रिटी

तुम्ही या अॅपवर आपली वॉल तयार करून त्यावर व्हिडिओ अपलोड करू शकता. लोकांना तुमचे व्हिडिओ आवडल्यास ते व्हायरल होऊ शकतात. हे व्यासपीठ तुम्हाला डिजिटल सेलिब्रिटी होण्याची संधी देईल.

 

सर्वात लाइट-वेगवान अॅप
डाटा खर्चाकडे बघता हे अॅप विशिष्ट पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. 3.2 एमबीचे हे अॅप अत्यंत लाइट आहे. म्हणजेच ते तुमच्या फोनच्या मेमरीवर अतिरिक्त बोजा टाकणार नाही. सोबतच त्याचा वेग सर्वाधिक असल्याने व्हिडिओ अत्यंत वेगात उघडतात. इतकेच नव्हे तर firstwall अॅप आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर (AI) काम करते. म्हणजेच जे व्हिडिओ तुमच्या आवडीचे आहेत, तेच सर्वात आधी पाहायला मिळतील.

 

तुम्ही हे अॅप जितके जास्त वापराल तितके जास्त त्याला तुमची आवडनिवड कळेल. हे अॅप सध्या अँड्रॉइड फोनसाठीच आहे. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल.

 

पुढील स्लाइड्‍सवर पाहा... संबंधित फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...