आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon Session Of Parliament Day 2 Live Updates Amit Shah Call To Uddhav Thackeray

अविश्वास ठराव...अमित शाहांची रणनीती, उद्धव ठाकरेंना फोन करून मागितला शिवसेनेचा पाठिंबा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशच्या दुसर्‍या दिवशी मोदी सरकारला घेण्यासाठी विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. चार वर्षांपूर्वी केंद्रात स्थापन झालेल्या नरेंद्र मोदी सरकारला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप सरकारला दणका बसला. सरकारविरुद्ध अविश्वास ठराव लोकसभेत मांडण्यात आला. तेलगू देसम पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतरविरोधी पक्षांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. सभापती सुमित्रा महाजन यांनी तेदेपाला अविश्वास ठराव मांडण्‍यास परवानगी दिली आहे. त्यामुळे भाजप सरकारची चांगलीच गोची झाली आहे. त्यात शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात असल्यामुळे भाजप समोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा मागितला आहे. एकट्या भाजपकडे 274  खासदार आहेत. म्हणजे भाजपकडे बहुमतापेक्षा (268) अधिक संख्याबळ  आहे. एनडीएचे खासदार एकत्र केले तर सदस्यसंख्या 313 वर जाते. मात्र 18 खासदारांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही.

 

यूपीएचे 64, टीएमसी 34, अण्णाद्रमुक 37, तेदेपा 16 टीआरएस 11 माकप 9 व सपाच 7 खासदार सरकारविरोधात आहेत.

 
दुसरीकडे, शिवसेनेने आपल्या सर्व खासदारांची शुक्रवारी सकाळी 10 वाजता बैठक बोलावली आहे. सर्व खासदारांना उपस्थित राहाण्‍याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

काय म्हणाले संजय राऊत..

लोकशाहीत विरोधी पक्षाची बाजू आधी ऐकायला हवी. मात्र, मतदानाच्या वेळी जे उद्धव ठाकरे सां‍गतील तेच आम्ही करू, असे शिवसेना नेता संजय राऊत यांनी सांगितले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...