आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वास ठरावावर चर्चा..घणाघाती आरोपानंतर राहुल गांधींनी दिली मोदींना \'जादूची झप्पी\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अविश्वास ठरावावर चर्चेला सुरुवात, तेदेपा म्हणाले, भाजप संपुष्ठात येईल  

राहुलने जवळपास 29 मिनिटांचे भाषष ठोकले, म्हणाले मोदी सरकारच्या नीती चुकीची  
राहुल यांनी केलेल्या आरोपांनंतर लोकसभेत अभुतपूर्व गोंधळ

 

नवी दिल्ली- मोदी सरकार विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. राहुल गांधी यांनी राफेल विमान करार, बेरोजगारी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या आरोपामुळे सत्ताधार्‍यांनी प्रचंड गदारोळ केला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झोके घेत असताना चिनी सैनिकांनी भारताच्या क्षेत्रात घुसखोरी केली होती, असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत, असेही राहुल म्हणाले. मोदींच्या दबावात येथून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाला खोटे सांगितले. सरकारच्या जुलुमांचा शिकार देशातील शेतकरी ठरत आहे.

 

देशभरात महिला, दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिला संरक्षणात मोदी सरकारचे अपयशी ठरले आहेत. देशात अत्याचारासोबतच दडपशाहीही वाढली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी सत्तेशिवाय राहू शकत नाही. देशाचे संविधान, लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. 

 

आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी 'पप्पू'वरून मोदींवर पलटवार केला आहे. भाजपसाठी मी पप्पू आहे परंतु माझ्या मनात द्वेष नाही.  भाजप आणि संघाने मला  भारतीय, हिंदू असल्याचा अर्थ समजावून सांगितला, मी त्यांचा आभारी आहे. भाषणानंतर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. मोदींनीही राहुल गांधींसोबत हस्तांदोलन केले.
 

मनोरंजन केल्याबद्दल राहुल गांधींचे धन्यवाद, अशा शब्दात‍ भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.

 

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी सांगितले की, राहुल यांचे आरोप तथ्यहीन आहेत. त्यांनी पुराव्यासह आरोप करावे. यावरून सभागृहात प्रचंड गोंधळ झाला.

 

दरम्यान, एकजूट झालेले विरोधक मोदी सरकारच्या विरोधात शुक्रवारी अविश्वास प्रस्तावावर मतदान करतील. सभागृहात रालोआकडे 315खासदार (अध्यक्षांसह) आहेत. त्यामुळे रालोआचा पराभव होण्याची शक्यता नाहीच. मात्र, अविश्वास ठरावाच्या बहाण्याने 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी काँग्रेस एकजूट विरोधकांमार्फत रालोआची घेराबंदी करण्यास सज्ज झाली आहे.


आतापर्यंत एकजूट विरोधकांचा आकार समोर आलेला नाही. अनेक पक्ष एकजूट विरोधकांच्या नावावर मोठ्या मंचांवर एकत्र दिसले तर आहेत, पण जागावाटपाच्या नावावर त्यांच्यात सहमती दिसत नाही. त्यामुळे आता अविश्वास प्रस्तावाच्या नावावर लोकसभा निवडणुकीच्या 10  महिने आधी अनेक प्रादेशिक पक्षांनी आपले पत्ते उघड केले आहेत. त्यामुळे देशात रालोआ विरुद्ध एकजूट विरोधक असे चित्र स्पष्ट होत आहे. जागांच्या हिशेबाने देशातील 9  मोठ्या राज्यांत भाजपला प्रादेशिक पक्षांकडून सर्वाधिक आव्हान मिळण्याची शक्यता आहे. तेथे हे पक्ष राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. या 9 राज्यांत लोकसभेच्या 340  जागा आहेत. तेथे 10  प्रमुख प्रादेशिक पक्ष अविश्वास प्रस्तावाच्या आधी काँग्रेसच्या, तर 7  रालोआच्या बाजूने दिसत आहेत. त्यात अनेकांनी मतदानापासून दूर राहून भविष्यातील शक्यता कायम राखल्या आहेत.


महाराष्ट्र-48 जागा : शिवसेना पुन्हा भाजपसोबत?
शिवसेना केंद्रात व महाराष्ट्रात रालोआचा घटकपक्ष आहे. 2019  ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे शिवसेना म्हणत असली तरी गुरुवारी पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यात 122 भाजप व 63 शिवसेनेकडे आहेत. दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले आहेत.
> भाजप 24 जागांवर लढला, 23 जागा जिंकल्या. शिवसेनेला 20 पैकी 18 जागा.


तामिळनाडू - 39 जागा : अण्णाद्रमुक पुन्हा चर्चेत
तामिळनाडूच्या सत्तारूढ अण्णाद्रमुकने अविश्वास प्रस्तावापासून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. सीएम पलानीसामी म्हणाले, कावेरी मुद्द्यावर कोणीही साथ दिली नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत अण्णाद्रमुक 2019 आधी रालोआत सहभागी होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. याआधीही अण्णाद्रमुक व भाजपच्या जवळीकतेची चर्चा झाली आहे.
> अद्रमुकचे 37 व भाजपचा 1 खासदार आहे. द्रमुक संपुआचा घटक आहे.


आंध्र + तेलंगणा- 42 जागा : टीडीपी, टीआरएस भाजपपासून दूर
आंध्र प्रदेशचा सत्तारूढ पक्ष टीडीपीने 2014 ची लोकसभा निवडणूक भाजपसोबत मिळून लढली होती. मात्र, आता तो रालोआपासून लांब आहे. अविश्वास प्रस्ताव टीडीपीनेच आणला आहे. तेलंगणाची सत्तारूढ टीआरएस कायम भाजपविरोधी राहिली आहे. असे असले तीर जगन रेड्डी यांचा वायएसआरसीपीची भूमिका स्पष्ट नाही. भाजप व जगन रेड्डी लवकरच एकत्र येतील, असे वृत्त आहे.
> टीडीपीचे 16, वायएसआरसीपीचे 9 व टीआरएसचे 11 खासदार आहेत.


प. बंगाल- 42 जागा : टीएमसी, काँग्रेससोबत
ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील टीएमसी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने आहे. टीएमसीने आपल्या खासदारांसाठी व्हिपही जारी केला आहे.
> राज्यात टीएमसीचे 34 काँग्रेसचे 4 व भाजपचे 2 खासदार आहेत.


ओडिशा- 21 जागा : बीजद, विरोधकांसोबत
बीजद रालोआविरुद्ध मतदान करेल. पक्षाने खासदारांना पक्षादेश जारी केला आहे. खासदारांना शुक्रवारी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
> बीजदचे 20, भाजपचा 1 खासदार आहे. भाजपला 21.50% मते.


कर्नाटक- 28 जागा : काँग्रेस व जेडीएस
राज्यात आघाडी सरकार आहे. जेडीएस प्रस्तावाच्या बाजूने राहिले हे निश्चित मानले जाते. दोघे आगामी निवडणूक एकत्र लढवू शकतात.
> भाजपचे 17, काँग्रेसचे 9 व जेडीएसचे 2 खासदार आहेत.


उत्तर प्रदेश- 80 जागा : सपा, बसप, काँग्रेस
सपा प्रस्तावाच्या बाजूने मतदान करेल असे निश्चित मानले जात आहे. बसपचे लोकसभेत खासदार नाहीत. ते आघाडीही करू शकतात.
> भाजपचे 69, सपाचे 7, काँग्रेस व अपना दलचे 2-2 खासदार.


बिहार- 40 जागा : राजद प्रस्तावाच्या बाजूने
लालूंचा राजद विरोधकांच्या बाजूने राहिला आहे. पक्ष अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करेल.
> राज्यात रालोआचे 33 खासदार अाहेत. राजदचे 4, काँग्रेसचे 2 खासदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...