आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- पाकिस्तानचे निर्धारित पंतप्रधान इम्रान खान येत्या 18 ऑगस्ट रोजी शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला जाण्यासाठी माजी क्रिकेटपटू आणि पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू निघाले आहेत. 'सद्भावना दूत म्हणून पाकिस्तानात जात आहे. उभय देशांमधील संबंध सुधारतील', असा विश्वास नवज्योतसिंग सिद्धू यांनी अटारी-वाघा बॉर्डरवर पोहोचल्यानंतर व्यक्त केला आहे.
इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याचे सिद्धू यांनी निमंत्रण मिळाले होते. त्यांना पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसाही मिळाला आहे. सिद्धू यांनी या सोहळ्यात जाण्यासाठी पंजाब आणि केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सिद्धूच्या जाण्याबाबत काहीही आक्षेप नसल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रकरणाला राजकीय महत्त्व देण्याची गरज नसल्याचेही ते म्हणाले.
गावस्कर आणि कपिल देव यांनी दिला स्पष्ट नकार..
इम्रान खान यांच्या पक्षाकडून शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण सुनील गावस्कर, कपिल देव, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह बॉलिवूड स्टार आमीर खानला देण्यात आले होते. मात्र, सुनील गावस्कर आणि कपिलने मात्र सोहळ्यास जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुनील गावस्करने तर याबाबत फोनवर इम्रान खान यांना कळवले आहे. कपिल आणि सुनील गावस्कर यांनी त्यांची आधीची नियोजित इतर कामे असल्याने शपथविधी सोहळ्याला जाणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. सुनील गावस्कर या काळात इंग्लंडमध्ये असणार आहे. भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.
सुखबीर म्हणाले, पाकले गेले तर तिथेच राहा
शिरोमणी अकाली दलचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनी सिद्धू यांच्यावर कडाडून टीका केली आहे. सिद्धू पाकला गेले तर तिथेच राहणे योग्य ठरेल असे ते म्हणाले. त्यांनी असे केल्यास पंजापमध्ये आणि देशातही शांतता राहील असेही बादल म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.