आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुलने घेतली मोदींची गळाभेट- म्हणाले, टीका करूनही प्रेम करणे हेच खरे हिंदुत्व, मी तेच करतोय...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकार विरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर लोकसभेतील चर्चेत राहुल गांधी यांनी राफेल विमान करार, बेरोजगारी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधींच्या आरोपामुळे सत्ताधार्‍यांनी प्रचंड गदारोळ केला. परंतु त्याला न जुमानता राहुल यांनी दमदार भाषण ठोकले आणि अवघ्या काही मिनिटांत सभागृह जिंकून घेतले.

 

आपल्या भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी 'पप्पू'वरून मोदींवर पलटवार केला आहे. तुमच्यासाठी मी पप्पू आहेच परंतु माझ्या मनात द्वेष नाही. भाजप आणि संघाने मला  भारतीय, हिंदू असल्याचा अर्थ समजावून सांगितला, मी त्यांचा आभारी आहे. भाषणानंतर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या आसनाजवळ जावून त्यांची गळाभेट घेतली. मोदींनीही राहुल गांधींसोबत हस्तांदोलन केले.


राहुल गांधी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...

- पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या पंतप्रधानांसोबत झोपाळ्यावर झोके घेत असताना चिनी सैनिकांनी भारताच्या क्षेत्रात घुसखोरी केली होती, असा घणाघाती आरोप राहुल गांधी केला.

- सरकारच्या जुलुमांचा शिकार देशातील शेतकरी ठरत आहे. नरेंद्र मोदी माझ्या नजरेस नजर मिळवू शकत नाहीत, असेही राहुल म्हणाले.

- मोदींच्या दबावात येथून संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाला खोटे सांगितले.

- देशभरात महिला, दलितांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. महिला संरक्षणात मोदी सरकारचे अपयशी ठरले आहेत. देशात अत्याचारासोबतच दडपशाहीही वाढली आहे.

- नरेंद्र मोदी आणि अमित शाह ही जोडी सत्तेशिवाय राहू शकत नाही. देशाचे संविधान, लोकशाहीवर हल्ला केला जात आहे.

- देशाच्या इतिहासात प्रथमच देश महिलांसाठी असुरक्षित असल्याचे म्हटले गेले आहे.
- अल्पसंख्याक, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, महिलांवर हल्ले होत आहेत. त्या प्रकारावर पंतप्रधान 'ब्र' सुद्ध काढत नाही. उलट त्यांचे मंत्री हल्लेखोरांच्या गळ्यात हार घालून त्यांच्या निंदनिय कृत्याचे जाहीर समर्थन करतात.
- राफेल विमान खरेदी करारावरून राहुल गांधी यांनी भाजप सरकारवर कडाडून हल्लाबोल केला. युपीए सरकारच्या काळातील किमतीत भाजप सरकारने भरमसाठ वाढ करून आपल्या कॉर्पोरेट मित्रांना फायदा करून दिल्याचा आरोपीही राहुल गांधी यांनी केला.
- शेतकर्‍यांचा मुद्दा उपस्थित करून राहुल गांधी म्हणाले, देशातील शेतकर्‍यांनी पंतप्रधानांना मतदान करून जिंकून दिले. पंतप्रधानांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याऐवजी उद्योगपतींचे कर्जे माफ केली. शेतकरी मात्र ओरडचत राहिले.
- राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी भाजप, राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस)  आभार मानले. राहुल म्हणाले, मी संघ आणि भाजपचा आभारी आहे. त्यांच्यामुळे मला काँग्रेस काय आहे, हिंदू असल्याचा अर्थ समजून घेता आहे.
- भाषणानंतर राहुल यंनी पंतप्रधानांच्या आसनाजवळ जाऊन त्यांची गळाभेट घेतली. या अनपेक्षीत गळाभेटीने  मोदींसह सर्व सत्ताधारी सदस्य अवाक् झाले. नंतर आपल्या आसनाजवळ येऊन म्हणाले की, ही हिंदू संस्कृती आहे. तुमच्या मनात माझ्याविषयी कितीही द्वेष असेल तरीही मी मात्र तुमच्यासोबत प्रेमभावनेन वागत राहील. हीच हिंदू संस्कृती आहे.

 

बातम्या आणखी आहेत...