आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवतेची गाणी गात प्रत्येकाच्या मनात माणुसकी जागवणारे प्रख्यात कवी-गीतकार पद्मभूषण गोपालदास नीरज कालवश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ लखनऊ- 'शोखियों में घोला जाए, फूलों का शबाब, उसमें फिर मिलायी जाए, थोड़ी सी शराब, होगा यूं नशा जो तैयार, वो प्यार है...' यासारख्या गीतांचे रचनाकार गोपालदास 'नीरज' यांचे गुरुवारी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मंगळवारी त्यांना आग्रा येथील खासगी रुग्णालयात, नंतर दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 


'नीरज' यांचा जन्म उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात पुरवली गावात ४ जानेवारी १९२५ रोजी झाला. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत. साहित्यिक, शिक्षक व कवी तसेच गीतकार म्हणून ते लोकप्रिय होते. चित्रपटांतील गीतांच्या त्यांच्या रचना प्रचंड गाजल्या. १९९१ मध्ये त्यांना पद्मश्री, तर २००७ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रपट गीतांसाठी सलग तीन वेळा त्यांना फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने त्यांना 'यश भारतीय' पुरस्काराने सन्मानित केले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये योगी सरकारने नीरज यांना भाष संस्थेचे अध्यक्षपद बहाल केले होते. 


टायपिस्ट म्हणून नोकरी करत घेतले शिक्षण 
गोपालदास नीरज यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. सहा वर्षांचे असताना त्यांचे वडील बाबू ब्रजकिशोर सक्सेना यांचे निधन झाले. १९४२ मध्ये ते दहावीत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यानंतर काही काळ त्यांनी इटावामध्ये कचेरीत टायपिस्ट म्हणून काम केले. नंतर चित्रपटगृहातील एका दुकानावरही काम केले. त्यानंतर काही दिवस बेरोजगार राहिले. यानंतरच्या काळात त्यांनी दिल्ली गाठली आणि स्वच्छता विभागात टायपिस्ट म्हणून नोकरी पत्करली. ही नोकरी सुटल्यावर कानपूरमध्ये त्यांनी डीएव्ही कॉलेजमध्ये लिपिक म्हणून काम सुरू केले. नोकरी करत त्यांनी परीक्षा देत १९४९ मध्ये १२वी, १९५१ मध्ये बीए आणि १९५३ मध्ये हिंदी साहित्याची प्रथम श्रेणीत पदवी प्राप्त केली. मेरठ येथील हिंदीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. मात्र, महाविद्यालय प्रशासनाने त्यांच्यावर वर्ग वेळेवर घेत नसल्याचे आणि प्रेम प्रकरणात गुंतल्याचे आरोप केले. यामुळे नाराज झालेले नीरज यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अलिगडच्या धर्म समाज कॉलेजमध्ये ते हिंदीचे प्राध्यापक झाले. अलिगडमध्ये मॅरिस रोडवर घर बांधले आणि त्याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. 

 

आठवणीतील गोपालदास नीरज, नीरज यांच्या काही रचना...

1) मुझको याद किया जाएगा
आंसू जब सम्मानित होंगे मुझको याद किया जाएगा
जहां प्रेम का चर्चा होगा मेरा नाम लिया जाएगा।
मान-पत्र मैं नहीं लिख सका राजभवन के सम्मानों का
मैं तो आशिक रहा जनम से सुंदरता के दीवानों का
लेकिन था मालूम नहीं ये केवल इस गलती के कारण
सारी उम्र भटकने वाला, मुझको शाप दिया जाएगा।

 

2) स्वप्न झरे फूल से
स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से
लुट गये सिंगार सभी बाग के बबूल से
और हम खड़े-खड़े बहार देखते रहे।
कारवां गुजर गया गुबार देखते रहे।

नींद भी खुली न थी कि हाय धूप ढल गई
पांव जब तलक उठे कि जिंदगी फिसल गई
पात-पात झर गए कि शाख-शाख जल गई
चाह तो निकल सकी न पर उमर निकल गई

 

3) आज की रात तुझे आखिरी खत और लिख दूं
आज की रात तुझे आखिरी खत और लिख दूं
कौन जाने यह दिया सुबह तक जले न जले?
बम-बारुद के इस दौर में मालूम नहीं 
ऐसी रंगीन हवा फिर कभी चले न चले।

 

4) जीवन कटना था, कट गया
जीवन कटना था, कट गया
अच्छा कटा, बुरा कटा
यह तुम जानो
मैं तो यह समझता हूं
कपड़ा पुराना एक फटना था, फट गया
जीवन कटना था कट गया

बातम्या आणखी आहेत...