आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- समाजसेवक स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी दिल्लीत धक्काबुक्की करण्यात आली. ही घटना भाजपच्या मुख्यालयाबाहेर घडली. अग्निवेश भाजप मुख्यालयात देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी आले होते. दीनदयाल उपाध्याय मार्गावर अग्निवेश यांना काही लोकांनी अडवले. त्यांना धक्काबुक्की केली.
या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. काही लोक स्वामी अग्निवेश यांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत. तसेच एका महिलेने त्यांच्यावर चप्पल उगारली.
अग्निवेश यांनी सांगितले की, ते वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी गेले होते. तेव्हा काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी माझ्यासह सहकार्यांना शिविगाळही केली. एवढेच नाही तर माझा फेटाही त्यांनी फेकून दिला. गद्दार म्हणूनही त्यांनी मला संबोधले.
झारखंडमध्ये ही झाला होती मारहाण...
दरम्यान, यापूर्वी अग्निवेश यांच्यावर 17 जुलै 2018 रोजी झारखंडमधील पाकूर येथे मारहाण करण्यात आली होती. जमावाने त्यांचे अंगावरील कपडेही फाडले होते. मारहाण करणारे लोक भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ता होते, असा आरोप अग्निवेश यांनी केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.