आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे चर्चेत आहे ही लेडी सोल्जर..हातात AK-47 घेऊन नक्षली भागात करते पेट्रोलिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- CRPF ने पहिल्यांदा छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागात महिला कमांडंटची नियुक्ती केली आहे. उषा किरण (27) असे या महिला कमांडंटचे नाव आहे. उषा किरण यांची CRPFच्या 80 व्या बटालियनमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून रुजू झाल्या होत्या.

 

प्रोमोशननंतर उषा यांनी नक्षलग्रस्त भागात जाण्याचा घेतला निर्णय...

प्रमोशन म्हणून वरिष्ठांनी उषा किरण यांच्यासमोर 3 पर्याय ठेवले होते. त्यात उषा किरण यांनी नक्षलगस्त भागात जाण्याचा निर्णय घेतला. रायपूरपासून 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या बस्तर जिल्ह्यातील दरभा डिव्हिजनच्या कॅम्पमध्ये उषा तैनात आहेत. उषा यांचे आजोबा आणि वडील सीआरपीएफमध्ये कार्यरत होते. गुडगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. विशेष म्हणजे ट्रिपल जंपमध्ये सूवर्णपदकही त्यांच्या नावावर आहे.

 

2012 मध्ये झाली काँग्रेस नेत्यासह 34 जणांची हत्या...
- उषा किरण यांची नियुक्ती करण्यात आलेल्या भागात 2012 मध्ये काँग्रेस नेत्यासह 34 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
- नक्षलग्रस्त भागातील नियुक्तीस उषा यांनी पहिली पसंती दाखावली होती. ऑपरेशनमध्ये त्या जवानांचे नेतृत्त्व करणार आहेत.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, नक्षलग्रस्त भागात AK-47 घेऊन पेट्रोलिंग करणार्‍या महिला महिला कमांडंट उषा किरण यांचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...